बालपणीच्या या फोटोमध्ये दीपिका खूपच क्यूट दिसत आहे. सध्या दीपिका रणवीर सोबत मुंबईमध्ये असून लॉकडाऊनध्ये ती तिच्या आई-बाबांना खूप मिस करत आहे. त्यामुळे हे सर्व संपल्यावर ती सर्वात आधी आपल्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. त्यानंतर ती शगुन बात्राच्या सिनेमा 'इंटर्न'च्या तयारीला सुरुवात करेल. हा 2015 मध्ये रिलीज झालेल्या हॉलिवूडच्या 'इंटर्न' सिनेमाचा हिंदी रिमेक असून यात दीपिकासोबत ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. लाइव्ह चॅटवेळी सलमानमुळे लाजून गुलाबी झाली यूलिया, पाहा असं केलं तरी काय?
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा छपाक हा सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज झाला. लग्नानंतर दीपिकाचा हा पहिलाच सिनेमा होता. मात्र या सिनेमाला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या सिनेमाती दीपिकाच्या अभिनयाचं मात्र सर्वांनी मनापासून कौतुक केलं होतं. हा सिनेमा दिल्लीच्या अॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित होता. याशिवाय ती रणवीर सिंह सोबत 83 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. माधुरीच्या मुलाने तिच्या साथीने गिरवले नृत्याचे धडे, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Deepika padukone