Home /News /entertainment /

...आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये सर्वांसमोर दीपिकानं रणवीरला भरला दम, पाहा VIDEO

...आणि अवॉर्ड फंक्शनमध्ये सर्वांसमोर दीपिकानं रणवीरला भरला दम, पाहा VIDEO

दीपिकाचा छपाक हा सिनेमा येत्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  मुंबई, 02 जानेवारी : अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. पण तरीही रणवीर पत्नी दीपिकावर असलेलं प्रेम सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रकार काही थांबलेला नाही. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अँकरनं रणवीर दीपिकाला असं करण्यापासून थांबवलं होतं पण आता पुन्हा एकदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये असाच प्रकार घडला. नुकत्याच पार पडलेल्या स्टार स्क्रिन अवॉर्ड 2019चा एक व्हिडाओ समोर आला आहे ज्यात दीपिका पदुकोण आमि कार्तिक आर्यन स्टेजवर उभे असलेले दिसत आहेत. ज्या ठिकाणी दीपिकाच्या आगामी सिनेमाच्या ट्रेलरचं दाखवणार आहेत. पण इतक्यात रणवीर सिंह ऑडियन्समध्ये उभा राहतो आणि जोरात आय लव्ह यू दीपिका असं ओरडतो. रणवीरच्या या कृतीवर सर्व कलाकार हसू लागतात. तर स्टेजवर उभी असलेली दीपिका सुरुवातीला लाजते पण नंतर रणवीरवर रागावत त्याला ट्रेलर पाहण्याचा सल्ला देते. अभिनेत्री नीना गुप्तांचा 'हा' सिनेमा Oscar च्या शर्यतीत, ट्विटरवर लिहिलं...
  दीपिकाचा 'छपाक' हा सिनेमा येत्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. दीपिकाच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजारनं केलं आहे. याच दिवशी अजय देवगणचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा सिनेमा रिलीज होत आहे. हे दोन्ही सिनेमा बायोपिक आणि बिग बजेट असल्यानं त्यांच्यात काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. काय आहे हृतिक रोशनच्या फिटनेसचं रहस्य, जाणून घ्या त्याचा Diet Plan VIDEO - हार्दिकचं ठरलं! 'एंगेज्ड' झाल्याचं 'साऱ्या हिंदुस्तान'ला असं कळवलं
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Deepika padukone, Ranveer singh

  पुढील बातम्या