2019 चं संपूर्ण वर्ष अभिनेता हृतिक रोशननं गाजवलं. या वर्षात त्याचे 'सुपर 30' आणि 'वॉर' असे दोन सिनेमा रिलीज झाले आणि ते सुपरहिटही ठरले. पण दोन्ही सिनेमांसाठी त्याला फिटनेसवर खूप मेहनत घ्यावी लागली...
बाॅलिवूडचा ग्रीक गाॅड हृतिक रोशन त्याच्या शरीरयष्टीसाठी सर्वांनाच प्रिय आहे. 2019 मध्ये रिलीज झालेल्या सुपर 30 मध्ये हृतिकला त्याचं वजन वाढवावं लागलं होतं तसेच या सिनेमात तो सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत होता. मात्र हे वाढवलेलं वजन 'वॉर'साठी कमी करणं हे सर्वात मोठं आव्हान त्यानं पेललं ते त्याच्या डाएटमुळे...
हृतिक रोशन सिनेमाच्या गरजेप्रमाणे वर्कआऊट करतो. जास्त करून तो कार्डिओ आणि स्ट्रेंथ (strenght) करतो. त्याचा ट्रेनर क्रिस गेथिन नेहमी त्याच्याकडून वर्कआऊट करून घेतो.
हृतिक पोटभर जेवण घेत नाही. उलट थोड्या थोड्या वेळानं थोडं थोडं खातो. त्यामुळे त्याचा मेटॅबोलिझम चांगला राहतो.
तो प्रोटिन डाएट घेतो. त्याच्यासाठी तो एग व्हाइट, चिकन आणि प्रोटीन शेक घेतो. त्याबरोबर बटाटा, ब्राऊन राईस, ओट्स खातो. सोबत भाज्याही भरपूर खातो.