अभिनेत्री नीना गुप्तांचा 'हा' सिनेमा Oscar च्या शर्यतीत, ट्विटरवर व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री नीना गुप्तांचा 'हा' सिनेमा Oscar च्या शर्यतीत, ट्विटरवर व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या सिनेमाला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी : अभिनेत्री नीना गुप्ता त्यांची पर्सनॅलिटी आणि स्पष्टवक्तेपणा यासोबतच शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. कोणत्याही प्रकारच्या सिनेमात बेस्ट परफॉर्मन्स देण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत ज्या सिनेमात काम केलं आहे त्या सर्व सिनेमात त्यांनाच सर्वाधिक लाइमलाइट मिळाला आहे. 60 वर्षीय नीना गुप्ता बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. आता त्यांच्या या यशात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. त्याच्या एका सिनेमाला सिनेजगतातला सर्वात मोठा अवॉर्ड ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. या यशावर नीना यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. तर सिनेमाच्या दिग्दर्शकानं तर हा सर्व चमत्कार असल्याचं म्हटलं आहे.

नीना गुप्ता यांचा द लास्ट कलर या सिनेमाला ऑस्करचं नॉमिनेशन मिळालं आहे. हा सिनेमा मागच्या वर्षी म्हणजे 4 जानेवारी 2019 ला रिलीज झाला होता. सेलिब्रेटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करण्यारे फिल्ममेकर विकास खन्ना यांचा हा सिनेमा आहे. या सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन मिळाल्यानं अभिनेत्री ते फिल्ममेकर पर्यंत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विकास खन्ना आणि नीना गुप्ता यांनी आपला आनंद सोशल मीडियावरुन व्यक्त केला.

विकास खन्ना यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन याची माहिती दिली. त्यांनी लिहिलं, 2020ची सर्वात चांगली सुरुवात. हा एक चमत्कार आहे. तुमच्या सर्वांचे आभार. आमचा सिनेमा द लास्ट कलर मनापासून तयार करण्यात आला होता. ऑस्कर अकादमीनं 2019 मध्ये बेस्ट सिनेमा अवॉर्डसाठी 344 सिनेमांची नावं जाहिर केली त्यात आमच्या सिनेमाचा समावेश आहे.

विकास खन्ना यांचं हे ट्वीट रिट्वीट करत नीना गुप्ता यांनी लिहिलं, माझा विश्वासच बसत नाही आहे. माझ्या सिनेमाला ऑस्कर नॉमिनेशन मिळालं आहे. मी खूप खूश आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारतात या सिनेमाला योग्य स्क्रिन न मिळाल्यानं अनेकांना या सिनेमाबद्दल माहितही नाही.

मुंबईमध्ये 2019 ला झालेल्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. या सिनेमाची कथा वृंदावन आणि वाराणसीमधील विधवा महिलांच्या जीवनावर आधारित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 08:59 AM IST

ताज्या बातम्या