मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khan Bodyguard Died: अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू; जीममध्ये आला हार्ट अटॅक

Salman Khan Bodyguard Died: अभिनेता सलमान खानच्या बॉडीडबलचा मृत्यू; जीममध्ये आला हार्ट अटॅक

सलमान खान बॉडीगार्ड  ( छायचित्र-अमित राय)

सलमान खान बॉडीगार्ड ( छायचित्र-अमित राय)

सलमान खानच्या बॉडीगार्डचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 30 सप्टेंबर :  बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीडबल सागर पांडेचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. शुक्रवारी व्यायाम करत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तात्काल रुग्णलयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.  सलमानचा बॉडीगार्ड सागर 45 वर्षांचा होता. सागरच्या जाण्यानं भाईजानला मोठं दु:ख झालं आहे. सागर अनेक वर्ष सलमानबरोबर होता. सागरनं सलमानचा बॉडी डबल म्हणून अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सलमानचा अत्यंत जवळचा माणूस म्हणून सागरकडे पाहिलं जायचं.

सलमानचा बॉडीडबल सागर दररोज त्याच्या गोरेगाव येथील त्याच्या घराजवळ असलेल्या जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जात होता.  शुक्रवारी सकाळी जो जिममध्ये गेला असता जिममध्ये ट्रेड मिल करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पहिल्यांदा त्याला सुविधा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात नेण्यात आलं. त्याला वाचवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दुपारी 2 वाजताच्या सुमारासा डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केलं.

हेही वाचा - Raju Srivastava यांना जिममध्ये आला होता Heart Attack; Gym करताना तुम्ही या चुका करत नाहीत ना?

 ( छायचित्र-अमित राय )

( छायचित्र-अमित राय )

भाईजानच्या बॉडीगार्ड सलमानचा बॉडी डबल म्हणून अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. सागरला सागर सलमान पांडे या नावानं देखील ओळखलं जात होतं. नुकताच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा देखील जीममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यानंतर आता सलमानच्या बॉडीगार्डचाही जीममध्येच मृत्यू झाल्यानं कलाकारांच्या आरोग्याविषयी मोठी शंका उपस्थित केली जात आहे.

बॉलिवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा बॉडी डबल प्रशांत वाल्डे यानं सागरच्या मृत्यूची माहिती दिली. प्रशांतनं म्हटलं, वर्कआऊट करताना सागरला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णलायात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला होता. प्रशांत पुढे म्हणाला, सागरच्या मृत्यूमुळे मला शॉक लागला आहे. तो फार लहान होता. एकदम फिट आणि हेल्दी होता. त्याने सलमानच्या बजरंगी भाईजान, ट्यूबलाइट, दबंग, दबंग 2, दबंग 3 सारख्या सिनेमात सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News