मुंबई, 29 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेता वरुण धवन नेहमीच चर्चेत असणाऱ्या कलाकरांपैकी एक आहे. त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. एक स्टारकिड असूनसुद्धा वरुणने स्वतः ची एक खास ओळख निर्माण केली आहे. लवकरच वरुण धवन आपल्या आगामी ‘भेडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. वरुण सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये तो अभिनेत्री क्रिती सेननसोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही व्हिडीओ आणि फोटो नुकतंच व्हायरल झाले होते. दरम्यान अभिनेत्याने डिजिटल प्लॅटफॉर्म ओटीटीबाबीत आपलं मत व्यक्त केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान वरुण धवनने ओटीटीबाबत संवाद साधताना सांगितलं की, अभिनेता शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांना त्याला ओटीटीवर पाहायचं आहे. इतकंच नव्हे तर बिग बी अमिताभ बच्चनदेखील या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लोकांना पसंत पडतील असं वरुणचं म्हणणं आहे. परंतु सलमान खानला आपल्याला ओटीटीवर नव्हे तर पडद्यावरच पाहायला आवडेल असंही वरुणने म्हटलं आहे. पिंकव्हीलाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना वरुणने सांगितलं की, नुकतंच शाहिद कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहून आनंद झाला. पुढेसुद्धा त्यांना ओटीटीवर पाहायला आवडेल. सलमान खानबाबत बोलताना वरुणने म्हटलं, मला सलमान खानला ओटीटीपेक्षा पडद्यावर पाहायला आवडेल. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहून सुखद अनुभव मिळतो. तसेच दिवाळी-ईद अशा मोठ्या सणांमध्ये त्यांचे चित्रपट रिलीज होतात. त्यामुळे या सणांचा आनंद द्विगुणित होत असल्याचंही यावेळी वरुणने सांगितलं.
यावेळी वरुणने आलियाबाबतही संवाद साधला. तो म्हणाला, बऱ्याच दिवसांनी तो पुन्हा एकदा आलिया भट्टसोबत काम करणार आहे. शेवटचं दोघांनी 2019 मध्ये आलेल्या ‘कलंक’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. वरुण म्हणाला की, मला आलियासोबत काम करायला आवडते. आम्ही खूप जुने मित्र आहोत. आलियासोबत माझी केमिस्ट्री चांगली आहे. आलियासोबत काम करण्याबाबत मी अजूनही सकारात्मक आहे आणि मला आशा आहे की मला लवकरच काम करण्याची संधी मिळेल. **(हे वाचा:** Ranbir Kapoor: रणबीरने सेलिब्रेट केला लग्नानंतरचा फर्स्ट बर्थडे; आलियाने दिली जंगी पार्टी ) वरुण धवन सध्या अनेक प्रोजेक्टसमध्ये व्यग्र आहे. तो लवकरच क्रिती सेननसोबत भेडियामध्ये दिसणार आहे. सोबतच तो जान्हवी कपूरसोबत ‘बवाल’ मध्ये काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तो कियारा आडवाणीसोबत ‘जुग जुग जियो’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत अनिल कपूर, नीतू सिंग आणि प्राजक्ता कोळीसारखी तगडी स्टारकास्ट होती.