जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘माझ्या स्वार्थासाठी चित्रपटाचं शूटिंग वारंवार रद्द केलं’; सलमाननं केला धक्कादायक खुलासा

‘माझ्या स्वार्थासाठी चित्रपटाचं शूटिंग वारंवार रद्द केलं’; सलमाननं केला धक्कादायक खुलासा

‘माझ्या स्वार्थासाठी चित्रपटाचं शूटिंग वारंवार रद्द केलं’; सलमाननं केला धक्कादायक खुलासा

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एकाच चित्रपटात दोन सुपरस्टार काम करत असल्यामुळं अंदाज अपना अपना अनेकदा लांबणीवर देखील गेला आहे. अन् वारंवार चित्रीकरण थांबत असल्यामुळं एकदा तर हा प्रोजेक्ट रद्दच केला जाणार होता. पाहा स्वत: सलमान खाननं सांगितलेला तो किस्सा…

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 25 मार्च: 90 च्या दशकातील अनेक चित्रपट आपल्या खास शैलीमुळे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विशेषत: अभिनेता आमिर खान आणि सलमान खान यांनी हे दशक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांनी गाजवलं. ‘अंदाज अपना अपना’ हा त्यांच्या अशाच अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामुळं बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या प्रकारच्या विनोदी चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एकाच चित्रपटात दोन सुपरस्टार काम करत असल्यामुळं अंदाज अपना अपना अनेकदा लांबणीवर देखील गेला आहे. अन् वारंवार चित्रीकरण थांबत असल्यामुळं एकदा तर हा प्रोजेक्ट रद्दच केला जाणार होता. पाहा स्वत: सलमान खाननं सांगितलेला तो किस्सा… अंदाज अपना अपना हा एक आनंद देणारा चित्रपट आहे. भारतीय चित्रपटांमधील हा एकहलकाफुलका विनोदी असा चित्रपट म्हणावा लागेल, असं सलमान खानने या मुलाखतीत म्हटलं होतं. या मुलाखतीचा एक व्हिडीओ नुकताच ई-पॅकेज या युटयुब चॅनेलवर (Youtube Channel) नुकताच अपलोड करण्यात आला आहे. यावेळी मी मुद्दाम या चित्रपटाची कंटिन्युटी तोडण्याचा प्रयत्न केला जेणेकरुन चित्रपट पूर्ण होण्यास उशीर होईल, असं गुपित या मुलाखतीत सलमान खानने उघड केलं. सहा महिन्यांत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला असता. मात्र मी या चित्रपटास उशीर करण्याचा प्रयत्न करीत होतो. चित्रीकरणादरम्यान मी तारखा देत नव्हतो. पायाच्या दुखापतीनं मी त्रस्त होतो. त्यातच मी माझे केस बारीक कापले होते. या सगळ्यामुळं चित्रपटाची कंटीन्युटी गेली. अवश्य पाहा - 750 रुपयांसाठी फारुख शेख यांनी केलं चित्रपटात काम; 20 वर्षानंतर मिळाले पैसे

    या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपटातील कलाकारांना न बोलण्याची अट घालण्यात आल्याची चर्चा होती. अशा अफवांचं स्पष्टीकरण देताना दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 2019 मध्ये या चित्रपटाला 25 वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्तानं राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की अमीर आणि सलमान एकमेकांच्या सोबत काम करत नाहीत,यासह अनेक अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. परंतु,प्रत्यक्षात असं काही नव्हतं. त्या दोघांचा सेटवरील वावर अतिशय चांगला होता. ते एकमेकांना चांगल्या पध्दतीनं मदत करायचे. नव्या रिपोर्टनुसार आम्हाला अजून काही गोष्टी समजल्या.या चित्रपटात अमीर आणि सलमान सलग‘आईला-उइमाँ’असं म्हणायचे. हे डायलॉग असलेला सीन केला की जोरजोरात हसायचे. तसंचबॉम्ब आणि पुष्पगुच्छाचा सीनही मजेशीर होता.सेटवर त्यांची मैत्री दिसायची,असे संतोषी यांनी सांगितलं. अवश्य पाहा - चित्रपटातील किस इमरान हाश्मीला पडली भारी; संतापलेल्या बायकोनं केलं रक्तबंबाळ संतोषी पुढं म्हणतात,की या चित्रपटातील एक्ट्रेस या प्रमुख समस्या होत्या. रविना टंडन **(Raveena Tandan)**आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांच्यात काहीसा तणाव होता. पण शूटिंग दरम्यान त्यांनी पूर्ण झोकून देत काम केलं. क्लायमॅक्स शूट करतेवेळी त्या दोघीही एकमेकींशी बोलत नव्हत्या. त्या दोघी आतिश चित्रपटाच्या शूटिंगवरुन येत असताना विमानतळावर त्यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे त्या दोघी एकमेकींशी बोलत नव्हत्या. एका दृश्यात त्यादोघींनाखांबाला बांधलेलंअसतं.त्यावेळी जेव्हा एकमेकींना काही सांगू इच्छित असत त्यावेळी त्या माझी मदत घेत. उदाहरण द्यायचं झालं तरत्यांच्यापैकी एक नटी मला आवाज द्यायची आणि सांगायची राजजी तिला सांगदोरी सैल ठेवयला. मग मी त्यांना ओरडायचो की अगं तुम्ही बोलाना परस्परांशी.जेव्हा आम्ही शूटिंगसाठी लाईटिंग बदलत होतो. तेव्हा मी क्रूला सांगितलं होतं की जोपर्यंत त्या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत,तोपर्यंत त्यांना बांधून ठेवा सोडूच नका.,असा मजेदार किस्साराजकुमार संतोषींनी सांगितला.

    अंदाज अपना अपना जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो फ्लॉप झाला. त्यानंतर चित्रपट टीव्हीवर,ऑनलाईन स्ट्रीमिंग (Online Streaming) आणि अन्य फॉरमॅटमध्ये पाहिला गेला तेव्हा तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि तो आयकॉनिक विनोदी सिनेमा म्हणून ठरवला गेला. सध्या काळातला सर्व माध्यमांद्वारे सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला हा सिनेमा असून त्याला आयएमडीबी रेटींग 8.20 असे मिळाले आहे. अमीर आणि सलमान या व्दयींनी चित्रपटात अमर-प्रेम ही पात्रं रंगवली. ही पात्र कॉमिक टायमिंगचा मापदंड ठरली. आजही आम्ही दोघं उत्तम मित्र असल्याचं सांगत अमीरचं सलमानने कौतुक केले. अमीर या चित्रपटात खूप मजेशीर होता. तोखूप बडबडायचा. त्यानं आपलं पात्र चांगल्या पध्दतीनं रंगवलं आहे,असं सलमान म्हणतो. चित्रपटाच्या प्रवासाबाबत राजकुमार संतोषी म्हणतात,की आमचा डिस्ट्रीब्युटर त्यावेळी नवा होता. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं कीहीबाब धोकादायक ठरू शकते. पण मला विश्वास होता. अन्य चित्रपटाच्या शूटिंगमुळं मी,सलमान आणि अमीर शहरात नव्हतो,त्यावेळी हा चित्रपट रिलीज करण्यात आला. हा चित्रपट योग्य पध्दतीनं रिलीज झाला नाही,त्याची प्रसिध्दीदेखील चांगली झाली नाही. हा चित्रपट नेमका कसा आहे,याची जाहिरातही करण्यात आली नाही. अमीर आणि सलमान ज्या पारंपारिक लव्ह स्टोरी असलेले चित्रपट करतात,तसा हा चित्रपट नव्हता,हे समजून घेण्यासाठी प्रेक्षक वेळ घेत होते. त्यामुळेच सुरुवातीला या चित्रपटाला यश मिळालं नाही मात्र नंतर तो यशस्वी ठरला. गेल्या काही वर्षांत अनेकदा असे रिपोर्टस आले की निर्माते अंदाज अपना अपनाचा सिक्वेल बनवणार आहेत आणि कित्येक नवीन कलाकार त्यात मुख्य भूमिका करण्यासाठी इच्छूक आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात