मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

...तर आमिर खान असता 'प्रेम'; 'हम आपके है कौन'ला 27 वर्षे पूर्ण!

...तर आमिर खान असता 'प्रेम'; 'हम आपके है कौन'ला 27 वर्षे पूर्ण!

5 ऑगस्ट 1997 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.

5 ऑगस्ट 1997 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.

5 ऑगस्ट 1997 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 ऑगस्ट- राजश्री प्रोडक्शनच्या ‘हम आपके है कौन’ (Hum Aapke Hai Kaun) या आयकॉनिक चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर गल्लोगल्ली, गावोगावी निशा आणि प्रेमचं वेड लागलं होतं. या दोघांची जोडी तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि सलमान खानने या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं होतं. आजही या चित्रपटाचा आणि त्यातील प्रत्येक गाण्याचा जादू चाहत्यांवर कायम आहे. आज या चित्रपटाला 27 वर्षे(27 Years Compelet) पूर्ण झाली आहेत.

5 ऑगस्ट 1997 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते. तसेच चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक गाणं चाहत्यांच्या मनात आजही जसच्या तसं आहे. तब्बल 27 वर्षानंतरही हा चित्रपट लोक आवडीने बघतात. यातील निशा आणि प्रेमची लव्हस्टोरी सर्वांच्या मनाला भावून जाते. मात्र या चित्रपटातील प्रेमच्या भुमिकेसाठी अभिनेता सलमान खान नव्हे तर आमिर खान होता मेकर्सची पहिली पसंत.

(हे वाचा: थरकाप उडवणारा VIDEO!श्वेता तिवारीच्या मुलीने शेयर केला डेब्यू फिल्मचा दुसरा टीजर)

‘हम आपके है कौन’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बडजात्याने प्रेमची भूमिका सर्वप्रथम अभिनेता आमिर खानला ऑफर केली होती. मात्र आमिर खानला चित्रपटाची स्टोरी तितकीशी अपीलिंग नाही वाटली. म्हणून त्याने या चित्रपटाला नकार दिला. मात्र सलमान खान त्यावेळी आपल्या करियरच्या वाईट वेळेतून जात होता. त्यामुळे त्याने पटकन या चित्रपटाला होकार दिला. आणि अशाप्रकारे तो प्रेम बनला. आणि हा चित्रपट बघता बघता एक आयकॉनिक चित्रपट बनला.

(हे वाचा: कपिल शर्मावर भडकला अक्षय कुमार; ट्वीट करत दिलं सडतोड उत्तर)

‘हम आपके है कौन’ सचिन पिळगांवकर आणि सविता बजाज यांच्या ‘नदिया के पार’ या चित्रपटाचा रिमेक आहे. निशा आणि प्रेमची लव्हस्टोरी तसेच कुटुंबातील प्रेम, माया, त्याग या सर्व गोष्टींनी या चित्रपटाला यशाचं शिखर गाठून दिलं आहे. आजही या चित्रपटाची लोकप्रियता तशीच आहे.

First published:

Tags: Aamir khan, Madhuri dixit, Salman khan