मुंबई, 5 ऑगस्ट- टीव्हीवरील कॉमेडी किंग कपिल शर्मा(Kapil Sharma) पुन्हा एकदा आपल्या शोसह धमाकेदार एन्ट्री करत आहे. 15 ऑगस्टदिवशी तिच्या शोचा पहिला एपिसोड प्रक्षेपित केला जाणार आहे. आणि पाहिल्याचं एपिसोडमध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या ‘बेल बॉटम’(Bell Bottom) चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून येणार आहे. मात्र तत्पूर्वीचं कपिलने असं काहीतरी म्हटलं आहे, की त्यामुळे अक्षय नाराज झाला आहे. इतकचं नव्हे तर त्याने ट्वीट करत म्हटलं आहे, ‘भेटल्यावर मी तुला बघून घेईन’.
नुकताच 3 ऑगस्टला अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय एका गुप्तहेरच्या भूमिकेत दिसून येत आहे. चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून चाहत्यांनी अक्षयचं खुपचं कौतुक केलं आहे. तसेच चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. मात्र चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यावर 1 दिवस नंतर अक्षय आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या अंदाजात अक्षयची मज्जासुद्धा केली आहे.
(हे वाचा;शाहरुख खानने कानशिलात लगावलेल्या प्रकरणात हनी सिंगला पत्नीने दिली होती साथ )
कपिलने ट्रेलरवर ट्वीट करत म्हटलं, ‘खुप सुंदर ट्रेलर आहे अक्षय सर, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा’. यावर लगेच ट्वीट करत अक्षयने म्हटलं ‘जेव्हा तुला समजलं की, मी शोमध्ये येणार आहे, लगेच शुभेच्छा दिलास, त्याआधी नाही. थांब तुला भेटून सांगतो’. त्यांच्या या मजामस्तीचा चाहते खुपचं आनंद लुटत होते. आणि मजेशीर कमेंट्ससुद्धा करत होते. आपल्याला सांगू इच्छितो की, अक्षय कुमारने आत्तापर्यंत तब्बल 25 वेळा कपिलच्या शोवर उपस्थिती लावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Kapil sharma