मुंबई, 5 ऑगस्ट- अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari Daughter) छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच ती एक तरुण आई म्हणूनही ओळखली जाते. श्वेताला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. ती एक सिंगल मदर आहे. श्वेताची मुलगी पलकसुद्धा (Palak Tiwari) तिच्यासारखीचं सुंदर आहे. आत्ता पलक बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. ती रोजी: द सेफ्रोन चॅप्टर (Rosie: The Saffron Chapter) या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला होता. त्यावरून हा चित्रपट एक रहस्यमयी चित्रपट असल्याचं दिसत आहे. आत्ता या चित्रपटाचा दुसरा टीजरसुद्धा रिलीज झाला आहे त्यामध्ये अभिनेता अरबाज खानचा फर्स्ट लुक दिसून येत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री पलक तिवारीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या ‘रोजी: द सेफ्रोन चॅप्टर’ या चित्रपटाचा दुसरा टीजर रिलीज केला आहे. यामध्ये अभिनेता अरबाज खान एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. तर अरबाजनेसुद्धा रात्री उशिरा आपल्या या फर्स्ट लुकचा टीजर आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे.
(हे वाचा: HBD: बेस्ट 'फीमेल विलन' पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री आहे काजोल!)
या टीजरमध्ये अरबाज एका घरामध्ये काही तरी शोधत असतो. शोधता शोधता तो एका खोलीमध्ये पोहोचतो आणि तेथे असं काही भयानक पाहतो की ते पाहून तो किंचाळतो, मात्र तो काय पाहतो हे गुपित आहे. असा हा रहस्यमयी टीजर खुपचं पसंत केला जातं आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अरबाज पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.
(हे वाचा:हनी सिंगजवळ आहे कोट्यावधींची संपत्ती;पत्नीने भरपाई म्हणून मागितली मोठी रक्कम! )
तसेच चित्रपटाच्या पोस्टरवर असणारा पलक तिवारीचा लुकसुद्धा पसंत केला जात आहे. पलकवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतं आहे. पलक सोशल मीडियावर खुपचं सक्रीय आहे. ती सतत आपले बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. तसेच आई श्वेता तिवारीसोबतही अनेक फोटो ती शेयर करत असते. मध्ये काही दिवस पलक सोशल मीडियापासून दूर होती. मात्र पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Shweta tiwari