Bharat Public Review- अ‍ॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’

या सिनेमाची क्रेझ आता सोशल मीडियावर दिसते आहे. अनेकांनी सिनेमा पाहिल्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 11:10 AM IST

Bharat Public Review- अ‍ॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’

मुंबई, 05 जून- सुपरस्टार सलमान खानचा बहूप्रतिक्षित भारत सिनेमा आज प्रदर्शित झाला. बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी मंगळवारी सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. सिनेमा पाहण्यासाठी सुनील शेट्टी, अनिल कपूर, तब्बू, बॉबी देओल, सनी लिओनी, संजय लीला भन्साळी, महेश मांजरेकर, जॅकी श्रॉफ आणि क्रिती सेनन यांसारखे अनेक स्टार आले होते. सिनेमा पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनी सिनेमाचं कौतुकच केलं नाही तर सोशल मीडियावर लोकांना हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही केलं. तसेच लोकांनीही सिनेमा पाहिल्यावर सोशल मीडियावर भारतच्या कौतुकाचे पूल रचले.

लग्नाच्या प्रश्नावर सलमान खान म्हणतो, या संकल्पनेवर माझा विश्वास...कतरिनासोबतचा फोटो पोस्ट करून मोहम्मद कैफने सांगितलं दोघांचं नातं काय?

या सिनेमाची क्रेझ आता सोशल मीडियावर दिसते आहे. अनेकांनी सिनेमा पाहिल्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट असेल असेच दिसते. एका यूझरने लिहिले की, ‘सिनेमा चांगला गल्ला कमवेल. पूर्वार्ध चांगला आहे. तसेच सिनेमाचा शेवटही चांगला आहे. यावेळी सिनेमात सलमानच्या अ‍ॅक्शनऐवजी भावनिक गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं आहे.’'या' पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट

दुसऱ्या यूझरने लिहिले की, ‘हा सिनेमा पडवतो. कुटुंबातील प्रत्येकाला हा सिनेमा आवडेल.’ अनेकांनी लिहिले की, ‘सलमानला अभिनय येत नाही असं म्हणाऱ्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे.’ सलमानसोबतच कतरिनाच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. अनेकांनी राहून राहून सिनेमाचा पूर्वार्ध आणि शेवट दमदार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सिनेमा उत्तरार्धात संथ होत जातो असंही अनेकांचं म्हणणं आहे. एकीकडे सिनेव्यापार विशेतज्ज्ञांच्या या सिनेमाकडून अनेक अपेक्षा आहेत तर दुसरीकडे प्रेक्षकही सिनेमाची तिकीटं मिळावी यासाठी तासन् तास रांगा लावून उभे असलेले दिसत आहेत. सिनेमाला माउथ पब्लिसिटीनेच गल्ला मिळेल असंही अनेकांचं मत आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...