'या' पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट

'या' पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल असं म्हटलं जात आहे. हा सिनेमा का सुपरहिट होऊ शकतो याची पाच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जून- सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'भारत' सिनेमा उद्या ईदच्या मुहूर्तावर ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. दक्षिण कोरियाच्या सुपरहिट सिनेमाचा हा रिमेक असणाऱ्या या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका आहे. या दोघांशिवाय सुनील ग्रोवर आणि दिशा पाटनीचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल असं म्हटलं जात आहे. हा सिनेमा का सुपरहिट होऊ शकतो याची पाच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान

अली अब्बास जफरचं दिग्दर्शन- सुपरस्टार सलमान खान आणि अली अब्बास जफर ही हिट जोडी पहिल्यांदा 'टायगर जिंदा है' सिनेमातून एकत्र आली होती. यानंतर दोघांनी 'सुलतान' सिनेमा केला. हे दोन्ही सिनेमे तुफान हिट झाले होते. त्यामुळे दोघांचा हा तिसरा सिनेमाही हिट असेल अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

कतरिना- सलमानची केमिस्ट्री- आतापर्यंत सलमान आणि कतरिनाची जोडी मोठ्या पडद्यावर हिटच ठरली आहे. दोघांनी सहा सिनेमांत एकत्र काम केलं आहे. सलमानने याची कबुली देत म्हटलं आहे की, दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेच त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हिट होते.

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

अक्शन, रोमान्स- अक्शन रोमान्स आणि इमोशन हे असं त्रिकूट आहे जे हमखास मोठ्या पडद्यावर चालतंच. अनेक हिट सिनेमांमध्ये हे समिकरण वापरलं जातं. त्यातही सलमानचे असे मसालापट सिनेमे पसंत केले जातात.

हिट सिनेमांचा रिमेक- आतापर्यंत हे साऱ्यांनाच कळलं आहे की या सिनेमाची कथा ही नवीन नसून एका दक्षिण कोरियाच्या हिट सिनेमांचा हा रिमेक आहे. सिनेमाचा फॉर्म्युला याआधीच तपासून पाहिलेला असून तो हिट होता.

...म्हणून 'भारत'साठी कतरिना कैफनं 'स्ट्रीट डान्सर'ला केलं गुडबाय

ईदची सुट्टी- अनेक सुपरस्टार होळी, दिवाळी, ख्रिसमस आणि ईदच्य दिवशी आपला सिनेमा प्रदर्शित करण्याला प्राधान्य देतात. याचं खास कारण म्हणजे या सणांच्यावेळी मोठ्या सुट्ट्या लागून असतात. लोक सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सिनेमे पाहतात. याचा फायदा निर्मात्यांना होतो. त्यातही दरवर्षी ईदला सलमान त्याचा एक तरी सिनेमा प्रदर्शित करतोच आणि विशेष म्हणजे ते सिनेमा चालतातही.

भाऊ अरबाजने तोडले होते सलमानचे दात, काय घडलं होतं नेमकं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या