जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अरे देवा! प्रदर्शनापूर्वीच 'भारत'ची क्रेझ, या राज्यात तिकिटांसाठी रस्सीखेच

अरे देवा! प्रदर्शनापूर्वीच 'भारत'ची क्रेझ, या राज्यात तिकिटांसाठी रस्सीखेच

अरे देवा! प्रदर्शनापूर्वीच 'भारत'ची क्रेझ, या राज्यात तिकिटांसाठी रस्सीखेच

सलमान खानचा बहुचर्चित भारत सिनेमा उद्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमानच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात कमालिची उत्सुकता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 04 जून- सलमान खानचा बहुचर्चित भारत सिनेमा उद्या ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. सलमानच्या या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात कमालिची उत्सुकता आहे. म्हणूनच सिनेमाच्या अडवान्स बुकींगसाठीही त्याचे चाहते वेडे झाले आहेत. प्रीबुकिंच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर फक्त मोठ्याच नाही तर छोट्या शहरांमध्येही थिएटरच्या समोर हाउसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. ईदच्या तयारीला लागलेल्या फराहने सांगितलं की, सलमानच्या सिनेमांबद्दल एवढं क्रेझ आहे की, अनेकदा त्याचे चाहते नमाजानंतर सरळ त्याचा सिनेमा पाहायला जातात. याबद्दल कोणाच्याच मनात दुमत नसेल की सलमानच्या सिनेमांची त्याच्या चाहत्यांमध्ये वर्षभर क्रेझ असते. ‘या’ पाच कारणांमुळे सलमान खानचा भारत होईल हिट सलमानने कपिल शर्मा शोमध्ये ईदलाच तो सिनेमा प्रदर्शित का करतो याचं कारण सांगितलं होतं. ईदच्या दिवशी त्याचे चाहते त्याला सिनेमा पाहून ईदी देतात असं तो म्हणाला होता, मात्र ट्युबलाइट हा सिनेमा त्याला अपवाद ठरला होता. पण यावेळी हैदराबादमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त शो आधीच बुक झाले आहेत. असं म्हटलं जातं की, प्रदर्शनाच्या दिवशी सिनेमाचे सगळे शो हाउसफुल्ल आहेत. फक्त आहिलचा मामाच नाही तर या मुलांचा आजोबाही झालाय सलमान खान मुंबईत भारतचे सुमारे १५ टक्के शो बुक झाले आहेत. हे सर्व शो हाउसफुल्ल आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये जवळपास २५ टक्के प्रीबुकिंग झालं आहे तर बंगळुरूमध्ये देखील १५ टक्के बुकिंग झालं आहे. चेन्नईमध्ये सलमानच्या सिनेमाची फार क्रेझ दिसली नाही. पण उद्या या आकड्यांमध्ये अजून बदल होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात