रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

स्नेहाने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानच्या लकी सिनेमातून केली होती. सिनेमांपेक्षा ती ऐश्वर्या रायसारखी दिसणारी अभिनेत्री या एका गोष्टीमुळेच लोकांच्या लक्षात राहिली.

  • Share this:

मुंबई, 03 जून- सलमान खानच्या लकी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री स्नेहा उलाल सध्या तिच्या प्रकृती अस्वस्थेमुळे चर्चेत आली आहे. तिला अनेक दिवसांपासून ताप आला होता. हा ताप कमी न होता वाढतच जात होत्या. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त आराम करण्याच सल्ला दिला आहे. स्वतः स्नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून याबद्दल माहिती दिली. स्नेहाने स्वतःचे रुग्णालयातील दोन फोटो शेअर केले.

बॉलिवूड अभिनेत्रीकडून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट, सोशल मीडियात खळबळ

हे फोटो शेअर करताना स्नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आयुष्यात पहिल्यांदा मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. मला ताप आला होता. यावर अनेक उपाय केलेही. पण कोणत्याच उपचारांनी बरं वाटत नव्हतं अखेर मला रुग्णालयात भरती करण्यात आलं. मला कंटाळा येतोय पण माझ्याकडे नेटफ्लिक्स आणि माझी काळजी घेणारे अनेक लोक आहेत. मला लवकरात लवकर घरी जायचंय. तुम्ही सर्वांनी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.’

'जे मी भोगले ते यांना भोगायला लावू नका, मुलींना कधी डान्सर करू नका...'

स्नेहाच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी तिला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या. स्नेहाने आपल्या करिअरची सुरुवात सलमान खानच्या लकी सिनेमातून केली होती. सिनेमांपेक्षा ती ऐश्वर्या रायसारखी दिसणारी अभिनेत्री या एका गोष्टीमुळेच लोकांच्या लक्षात राहिली. लकी सिनेमांनंतर स्नेहाला बॉलिवूडमध्ये फारसं काम मिळालं नाही. यानंतरच तिने आपलं लक्ष दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवलं. तिथे तिने किंग, करंट या तेलगु सिनेमांमध्ये काम केलं. २०१५ मध्ये स्नेहाने बेजुबां इश्क या हिंदी सिनेमात शेवटचं काम केलं होतं.

प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

First published: June 3, 2019, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading