जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Fact Check : खरंच इतक्या जवळ आले होते सलमान-ऐश्वर्या? NMACCमधील आराध्याबरोबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Fact Check : खरंच इतक्या जवळ आले होते सलमान-ऐश्वर्या? NMACCमधील आराध्याबरोबरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

salman khan aaishwarya rai

salman khan aaishwarya rai

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटन सोहळ्याला नीता अंबानी यांनी सलमान आणि ऐश्वर्या दोघांना आमंत्रण दिलं होतं. ऐश्वर्या लेक आराध्यासह सोहळ्याला आली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,  03 मार्च : नीता मुकेश अंबानी क्लचरल सेंटरचं नुकतंच उद्धाटन झालं. या उद्धाटनानिमित्त काही दिवसांचा एक खास सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रणवीर सिंह,दीपिका पादुकोन, आलिया भट्ट, सलमान खान, शाहरूख खान सारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान खान आणि ऐश्वर्या राय मीडियाला एकत्र फोटो देताना दिसत आहे. पापाराझींसमोर ऐश्वर्या लेक आराध्याबरोबर फोटो देताना दिसतेय. सोबत बाजूला सलमान खान देखील उभा आहे. दोघेही ऑकवर्ड परिस्थितीत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.  अनेक वर्षांनी सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र दोघे खरंच इतक्या जवळ आले होते का? असा प्रश्न देखील अनेकांनी पडला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्धाटन सोहळ्याला नीता अंबानी यांनी सलमान आणि ऐश्वर्या दोघांना आमंत्रण दिलं होतं. ऐश्वर्या लेक आराध्यासह सोहळ्याला आली होती. तर सलमान खाननं एकट्यानंच हजेरी लावली होती.  जवळपास 20 वर्षांनी यानिमित्तानं दोघांना एकत्र पाहिलं गेलं. सलमान आणि ऐश्वर्या यांनी लव्ह स्टोरी सर्वश्रृत आहे. दोघांनी अनेक वेळा अनेक कार्यक्रमात पाहिलं गेलं आहे. पण दोघेही कधीच एकमेकांकडे पाहत नाहीत किंवा मीडियाला एकत्र फोटो देखील देत नाहीत.  पण आता समोर आलेल्या व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हेही वाचा - …म्हणून ऐश्वर्यानं सलमानला सोडून धरला अभिषेक बच्चनचा हात; दोघांची ब्रेकअप स्टोरी फारच थ्रीलर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला मैंने प्यार किया हे गाणं वाजत आहे. सलमान खान, ऐश्वर्या आणि आराध्या पापाराझींना पोझे देत आहेत. सलमान खान ऐश्वर्याकडे बघण्याचा प्रयत्न करत आहे. एका क्षणी दोघांचीही नजरा नजर होते पण सलमान लगेच दुसरीकडे बघतो. दोघेही फार ऑकवर्ड दिसत असले तरी हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

जाहिरात

सलमान खान, ऐश्वर्या आणि आराध्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदम खरा वाटत असला तरीही हा व्हिडीओ एडिट व्हिडीओ असल्याचं समोर आलं आहे.  या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत व्हिडीओ एडिटेड असल्याचं म्हटलं आहे. ऐश्वर्या आणि सलमान यांचे दोन वेगवेगळे व्हिडीओ एकत्र करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. गौरी खान, सुहाना आणि आर्यन यांच्याबरोबर पोझे देतानाचा सलमान खानचा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत म्हटलंय, भाईजानची बायको आणि आराध्याचं कपाळ आम्हाला या जन्मात तरी बघायला मिळणार नाहीये.  तर आणखी एक फोटो समोर आला आहे ज्यात, नीता अंबानी, गौरी खान आणि सलमान खान दिसत आहेत. आणि फोटोच्या डाव्या कोपऱ्यात ऐश्वर्या आणि आराध्या उभ्या असलेल्या दिसत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात