मुंबई, 11 मे- आमिर खानच्या 'जो जीता वहीं' सिकंदर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली पूजा बेदी आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा सिनेमा जरी सुपरहिट ठरला तरी पूजाच्या सिनेकरिअरमध्ये या सिनेमाचा फारसा फायदा झाला नाही. सिनेकरिअरपेक्षा ती मॉडेलिंग आणि विवादात्मक वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत राहिली. यात अग्रणी आहे ते म्हणजे तिचे अफेअर्स. पूजाने आतापर्यंत पाचहून जास्त स्टार सेलिब्रिटींना डेट केलं आहे. तर तिचे वडील कबीर बेदीही त्यांच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिले आहेत. कबीर यांनी आतापर्यंत चार लग्न केली. विशेष म्हणजे पूजाची सध्याची सावत्र आई ही तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.
अर्जुन मलायकाचं झालं ब्रेकअप ? 'या' फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा
सर्वात आधी पूजाच्या नावाची चर्चा झाली ती आदित्य पांचोलीसोबत. पण हे रिलेशनशिप फार काळ चाललं नाही. यानंतर ती फरहान फर्नीचरवालासोबत तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी 1994 मध्ये लग्नही केलं. पण लग्नाच्या काही वर्षांनंतरच दोघांमध्ये भांडण होऊ लागली आणि 2003 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. फरहानपासून पूजाला ओमार आणि आलिया ही दोन मुलं आहेत. यानंतर पूजा कोरिओग्राफर हनीफ हिलाल याला दोन वर्ष डेट केलं, पण इतर नात्यांप्रमाणे हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. द्विती विक्रमादित्यशीही पूजाचं 18 महिन्यांचं नातं राहिलं.
माधुरी नाही तर मेहुणीमुळे तुटलं संजय दत्तचं पहिलं लग्न
या सगळ्यानंतर पूजाने बिग बॉस सिझन 5 दरम्यान स्पर्धक आकाशदीप सहगलला डेट केलं. आकाशदीप ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेत अंशची भूमिका साकारली होती. फक्त पूजाचं नाही तर तिचे वडील कबीरही त्यांच्या वेगवेगळ्या रिलेशनशिपमुळे नेहमी वादात अडकले होते. कबीर यांनी वयाच्या 70 व्या वर्षी 43 वर्षीय परवीन दुसांजशी लग्न केलं. पूजाही परवीनपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे.
'या' सुपरस्टारकडे आहे कोट्यवधींचा व्हिला आमिर-सलमानकडेही नाही एवढी संपत्ती
पूजाला वयाच्या 48 व्या वर्षी अखेर तिचा जीवनसाथी मिळाला आहे. पूजाने गेल्यावर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी व्यावसायिक मानेक कॉन्ट्रॅक्टरशी साखरपुडा केला होता. पूजाने सोशल मीडियामार्फत आपल्या साखरपुड्याची बातमी सर्वांना सांगितली होती.
‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत नऊ ट्रक भरून वाटले आयस्क्रीम, कारण...
पूजा आणि मानेक यांचं एकत्रच शिक्षण झालं होतं. गोव्याचे राहणारे मानेक शाळेमध्ये पूजापेक्षा तीन वर्षांनी सिनिअर होते. याशिवाय पूजा जेवढी बोल्ड आहे तेवढीच बोल्ड तिची मुलगी आलिया फर्नीचरवालाही आहे. आलिया बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. तिचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. लवकरच आलियाही इतर स्टार किड्सप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?