मुंबई, 11 मे- सध्या अभिनेता शाहिद कपूर त्याच्या आगामी कबीर सिंग सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यात शाहिदचे वेगवेगळे लूक दिसत आहेत. दरम्यान त्याचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चांगल्या कमेंट लिहिण्यापेक्षा नेटकऱ्यांनी त्याची शाळाच घेतली आहे.
या व्हिडिओमध्ये एअरपोर्टच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीतून शाहिद आपलं सामान घेताना दिसत आहे, तर त्याच्या मागे सर्व कॅमेरे त्याची झलक टिपण्याच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे, शाहिद कारचा दरवाजा उघडा ठेवूनच त्यातून आपलं सामान बाहेर काढत आहे. पण शाहिदला ट्रोल करण्याचं कारण हे नाही तर दुसरंच आहे.
आपल्या सावत्र आईपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे 'ही' अभिनेत्री
या व्हिडिओमध्ये शाहिद दरवाजा उघडा ठेवून कारमध्ये बसलेला दिसतो. त्यानंतर खांद्यावरची एक बॅग पाठीला लावून तो बाहेर पडतो. पण यावेळी तो कारचा दरवाजा बंद न करता सरळ पुढे निघून जातो. याच कारणामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. काहींच्या मते, शाहिदमध्ये शिष्टाचारच नाहीये. तर काहींनी त्याला गर्विष्ठ म्हटलं. तरा काहींनी म्हटलं की, ‘तुझ्यात फार गर्व आहे. आपल्याच कारचा साधा तू दरवाजाही बंद करू शकत नाहीस का? आपल्या स्टाफचा मान ठेवायला शिक.’
मातृत्व बेतू शकत होतं जीवावर, तरीही चौथ्यांदा आई झाली हॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री
ऐकीकडे त्याला नेटकऱ्यांनी खडे बोल सुनावले तर काहींनी त्याचं समर्थन केलं. त्याच्या चाहत्यांनी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. ‘त्याची कार आहे... त्याचा चालक आहे... त्याला जे हवं ते तो करू शकतो.’ तर काहींनी ट्रोल करणाऱ्यांना निरुपद्रवी म्हटलं आहे.
‘मला अजूनही आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा...’ दीपिका पदुकोणला असं झालं होतं रणबीरशी प्रेम
लवकरच शाहीद कबीर सिंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलगु सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या सिनेमाची कथा अशा एका विद्यार्थ्याची आहे जो प्रेम भंगामुळे तो वाईट सवयींच्या आहारी जातो. या सिनेमात शाहिदसोबत अभिनेत्री कियारा आडवाणीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा