मुंबई, 15 डिसेंबर : ‘बिग बॉस 16’ सुरू झाल्यापासून लोक या शोच्या विरोधात उभे आहेत. याला कारण आहे साजिद खान. ‘बिग बॉस’च्या घरात ‘मीटू’ चा आरोपी साजिद खानला पाहून प्रेक्षक संतापले होते. ते पहिल्या दिवसापासून साजिद खानला बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणी करत आहेत. ‘बिग बॉस 16’ सुरू होऊन आता 10 आठवडे उलटले आहेत. पण साजिद खान अजूनही शोमध्येच आहे. साजिद खान भविष्यातसुद्धा खूप काळ शोमध्ये राहणार आहे. नॉमिनेट झाला तरी तो या घरातून बाहेर जाऊ शकत नाही. आता एवढ्या विरोधानंतर सुद्धा साजिद खान अजूनही या घरात का आहे याला एक कारण आहे. काय आहे हे कारण जाणून घ्या. बिग बॉसच्या घरातून निर्मात्यांशिवाय कोणीही साजिद खानला इच्छा असूनही बाहेर काढू शकणार नाही. याचे कारण काय, हे समोर आले आहे. ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांसोबत साजिद खानच्या कराराचा एक मोठा रिपोर्ट समोर आला आहे. पहिल्या दिवसापासून साजिद खानला ‘बिग बॉस 16’ मधून बाहेर काढण्याची मागणी करणाऱ्यांना यामुळे मोठा धक्का बसू शकतो. हेही वाचा - सलमान- शाहरुखला मागे टाकत ‘या’ सेलिब्रिटीने पटकावलं 2022 गुगल सर्चच्या टॉप 3 मध्ये स्थान साजिद खानला आतापर्यंत फक्त दोन-तीन वेळाच नॉमिनेशन मिळाले आहे. पण जेव्हाही नॉमिनेट केले जाते, तेव्हा टास्क किंवा इतर गोष्टी अशा प्रकारे डिझाइन केल्या जातात की साजिद खान बेघर होण्यापासून वाचतो. शोमधून चांगले स्पर्धक बेघर झाले, पण साजिद खानचं नाव कधीही यात आलं नाही. या आठवड्यात देखील साजिद खान नॉमिनेट झाला होता. पण त्याचवेळी वोटिंग बंद करण्यात आलं. यामुळे प्रेक्षकांनी केवळ निर्मात्यांवर पक्षपाती असल्याचा आरोप केला. तर साजिद खान ‘बिग बॉस’चा जावई असल्याचेही म्हटले आहे. साजिद खानला ‘बिग बॉस 16’ मधून बाहेर का काढले जात नाही? प्रत्येक वेळी तो का वाचला जातो? याचे कारण आता समोर आले आहे.
‘बिग बॉस’शी संबंधित सर्व अपडेट्स देणाऱ्या ‘द खबरी’ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर दावा केला आहे की साजिद खानचा निर्मात्यांशी करार आहे. यामध्ये साजिद खानला ‘बिग बॉस 16’ मध्ये राहण्यासाठी 15 जानेवारी 2023 पर्यंत किमान हमी देण्यात आली आहे. म्हणजे 15 जानेवारीपर्यंत बिग बॉसच्या घरातून साजिद खानला कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढले जाऊ शकत नाही. यामुळेच ‘बिग बॉस 16’चे निर्माते प्रत्येक वेळी साजिद खानला एलिमिनेशनपासून वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. साजिद खान चांगला खेळत आहे मात्र, या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे कळू शकलेले नाही आणि त्याची पुष्टीही होऊ शकलेली नाही. पण जर हा दावा खरा असेल तर पहिल्या दिवसापासून साजिद खानला ‘बिग बॉस 16’मधून बाहेर काढण्याची मागणी करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे. तसे, साजिद खानशी संबंधित वादांकडे दुर्लक्ष केले तर साजिद खान खूप चांगला खेळ करत आहे. ‘बिग बॉस 16’ मधील त्याची धमाल-मस्ती सर्वांनाच आवडते.