मुंबई, 2 फेब्रुवारी: सैराटमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूनं (Rinku Rajguru ) केवळ मराठी सिनेमातच नव्हे तर तर हिंदीतही आपली ओळख निर्माण केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ सिनेमात तिनं साकारलेली आर्ची ही भूमिका चाहत्यांच्या मनात अजूनही आहे. दरम्यान, नेहमी चर्चेत असणारी रिंकू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटसृष्टीत सध्या तिच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. नुकतीच तिने एक पोस्ट केली आहे. ज्यात ती तिच्या डिनर डेटविषयी बोलत आहे. या पोस्टमध्ये ती सैराटमधील तिचा सहकलाकार आकाश ठोसर (Aakash Thosar) सोबत दिसत आहे.
तर तोच फोटो आकाश ठोसरने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले कि, खूप खाल्लं यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार. तसेच रिंकू राजगुरूने आकाश ठोसरने तिचा तिच्या गाडीतला व्हिडीओ पोस्ट केलेला शेअर करून लिहिले कि, लवकरच पुन्हा भेटू.
दोघांच्या या इंस्टा पोस्टमुळे त्याच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आले आहे. चाहत्यांना ही जोडी तशीच खूप पसंत आहे आणि त्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रिंकू राजगुरू सैराटनंतर ‘मेकअप’,‘कागर’ या मराठी सिनेमात तर ‘100’,‘अनपॉज्ड’,‘200 हल्ला हो’ या वेबसिरीजमध्ये झळकली आहे. त्यानंतर आता ती ‘छुमंतर’ या मराठी सिनेमात दिसणार आहे. तर आकाश ठोसर ‘एफ यू-फ्रेंडशीप अनलिमिटेड’ या सिनेमात झळकला आहे. तसेच तो ‘लस्ट स्टोरीज’,‘1962 द वॉर इन दी हिल्स’ या सीरिजमध्ये दिसला आहे. यानंतर आता तो ‘घर’,‘बंदूक बिर्यानी’ या सिनेमातही दिसणार आहे.