मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /धक्कादायक! दिलीप कुमारांच्या निधनानंतर सायराबानू विषयी 'हे' केलं जातयं Search

धक्कादायक! दिलीप कुमारांच्या निधनानंतर सायराबानू विषयी 'हे' केलं जातयं Search

दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सायराबानू आहेत.

दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सायराबानू आहेत.

दिवंगत दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सायराबानू आहेत.

मुंबई 7 जुलै : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीपकुमार (DilipKumar) म्हणजेच मोहम्मद युसूफ खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला . दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital in Mumbai) मागील आठवड्यात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

दिलीपकुमार यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली. त्यांच्या पत्नी सायरा बानू (Saira Banu) यांनी कालच दिलीप यांच्यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं. वयाने 22 वर्षे लहान असणाऱ्या सायरा यांनी कायमच दिलीप यांची साथ दिली. शेवटच्या श्वासापर्यंत त्या दिलीप यांची काळजी घेत होत्या. (Dilip Kumar death)

अलव‍िदा Dilip Kumar :...आणि मधुबाला यांना शेवटचं पाहताना पाणावले होते दिलीप कुमार यांचे डोळे

1966 साली दिलीप आणि सायराबानू यांनी (Dilip Saira Wedding) विवाह केला होता. तेव्हा त्या दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी (Saira banu age) लहान होत्या. सायरा यांनीही काही चित्रपटांत काम केलं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतरच म्हणजेच 1981 साली दिलीप यांनी आस्मा साहिबा (Aasma Sahiba) यांच्याशी विवाह केला मात्र सायरा या दिलीप यांच्यासोबतच होत्या.

काहीच दिवसांत हे दुसरं लग्नही मोडंल. व दिलीप आणि आस्मा यांनी घटस्फोट घेतला. दिलीप कुमार यांच्या अफेअर्सचाही सायरा आणि दिलीप यांच्या नात्यावर परिणाम झाला नाही. त्यांनी दिलीप यांच्यासोबतच आयुष्य घालवण्याचं ठरवलं होतं.

सत्यजीत रे दिलिप कुमारांना का म्हणायचे मेथड किंग? पाहा काय आहे गंमतीशीर किस्सा

सायरा आणि दिलीपकुमार यांना कोणतही मूल नाही. त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणं पसंत केलं. सायरा यांच्या वयाविषयी नेहमीच चर्चा केली जाते. व त्यांच्या वयातील फरक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. पण वयाचा हा फरतक कधीच त्यांच्या संसारात अडथळा बनला नव्हता.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Dilip kumar, Entertainment