'नया दौर' या शूटिंग दरम्यान 40 दिवस आउटडोअर शूट करायचं होतं. पण मधुबालांचे वडील याकरता तयार नव्हते. त्यामुळे बीआर चोप्रा यांनी वैजयंतीमाला यांना संधी दिली. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आणि दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाच्या बाजुने साक्ष दिली. यामुळे दिलीप कुमार-मधुबाला यांच्या लव्हस्टोरीवर परिणाम झाला होता. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना लग्नासाठी विचारलं असता मधुबालांनी दिलीप कुमार यांना त्यांच्या वडिलांची माफी मागण्यास सांगितले. या गोष्टीस दिलीप कुमार यांनी नकार दिला होता. यावेळी दिलीप कुमार आणि मधुबाला पूर्णपणे वेगळे झाले.
यानंतर दिलीप कुमार यांचा सायरा बानो यांच्याबरोबर संसार सुरू झाला. मधुबाला जेव्हा खूप आजारी पडल्या होत्या त्यावेळी दिलीप कुमार यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्या खूपच कमजोर झाल्या होत्या. दिलीप कुमार यांना त्यांची ही अवस्था पाहून फारच वाईट वाटलं होतं. बीबीसीच्या मते मधुबाला यांनी दिलीप कुमार यांचे पाणावलेले डोळे पाहून असं म्हटलं होतं की, ' हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल गई, मै बहुत खुश हूं.'