जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तान्हाजीचा इतिहास खरा नाही', सैफ अली खानच्या वक्तव्यानं खळबळ

'तान्हाजीचा इतिहास खरा नाही', सैफ अली खानच्या वक्तव्यानं खळबळ

'तान्हाजीचा इतिहास खरा नाही', सैफ अली खानच्या वक्तव्यानं खळबळ

‘तान्हाजी’ सुसाट, रेकॉर्डब्रेक कामगिरी करत चित्रपटाने 9 दिवसामध्ये 143 कोटीची कमाई केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी: शिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारा तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तान्हाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं या चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खळबळ उडाली आहे. वॉरियर (Tanhaji: Unsung Warrior)’ बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असतानाच सैफनं दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर तान्हाजीच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. ‘चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास अर्धवट आहे. तो चुकीचा आहे. चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर मी भूमिकेच्या प्रेमात पडलो होतो, त्यामुळे त्यावर ठाम मत मांडू शकलो नाही. चित्रपटाचं चित्रिकरण सुरू असताना काही गोष्टी खटकत होत्या पण मला भूमिका सोडायची नव्हती. त्यामुळे मी काही बोलू शकलो नाही.’ सैफ अली खाननं एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तान्हाजी चित्रपटासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे. इतक्या दिवसांनंतर सैफ अली खानंनं आपलं मौन सोडलं खरं मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जाहिरात

गेल्या काहीदिवसांपासून ज्या प्रश्नापासून सैफ अली खान यांनी मौन पाळलं होतं. त्याचं उत्तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिलं आहे. त्यासोबतच सध्या देशात सुरू असलेल्या घटनांवर त्यांनी आपलं मत मांडलं. सध्या देशात जे सुरू आहे त्यासंदर्भात सैफनं खंत व्यक्त केली आहे. हेही वाचा- ‘…म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या’, मित्रानं केला मोठा खुलासा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात