'...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा

'...म्हणून शबाना आझमी अपघातातून थोडक्यात वाचल्या', मित्रानं केला मोठा खुलासा

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी: येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi Accident) यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी अपघात झाला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बोनी कपूर त्यांना भेटून आल्यावर शबाना आझमी या औषधांना चांगला रिस्पॉन्स देत असल्याचं सांगितलं आहे. शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.

शबाना यांच्या मित्रानं या अपघातानंतर मोठा खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं, 'अपघात होण्याआधी शबाना आझमी यांनी सीटबेल्ट लावला होता. सीटबेल्ट लावून त्या शांतपणे पडून असताना अचानक अपघात झाला. सीटबेल्ट लावल्यानं त्या वाचल्या नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.'

आता शबाना यांची प्रकृती स्थीर आहे. सीट बेल्ट लावल्यामुळे त्या वाचल्या. कोकिलाबेन रुग्णालयात सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. पुढच्या 48 तासांनंतर डॉक्टर रुग्णालयातून डिश्चार्ज देण्याबाबत सांगतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा-अपघात शबाना आझमींचा आणि ट्रोल झाली उर्वशी रौतेला ते सुद्धा मोदींच्या ट्वीटवरून!

शनिवारी पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शबाना आझमी यांच्या सफारी गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला होता. याप्रकरणी आता ट्रक चालकाने आझमी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोण आहेत शबाना आझमी?

शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला

अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण

आझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले

जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम

जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम

हेही वाचा-नोरा फतेहीच्या चॅलेंजने बादशहा झाला बरबाद! 'हाय गर्मी'वर केली सगळ्यात HOT स्टेप

First published: January 20, 2020, 12:13 PM IST

ताज्या बातम्या