जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / एक प्लेट भेळपुरीसाठी 8 जणांमध्ये युद्ध; रिचानं शेअर केला थक्क करणारा VIDEO

एक प्लेट भेळपुरीसाठी 8 जणांमध्ये युद्ध; रिचानं शेअर केला थक्क करणारा VIDEO

एक प्लेट भेळपुरीसाठी 8 जणांमध्ये युद्ध; रिचानं शेअर केला थक्क करणारा VIDEO

रिचानं एक चकित करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक भेळपुरीच्या एका प्लेटसाठी एकमेकांविरोधात लाठीहल्ला करताना दिसत आहेत. भारतातील WWE अशा आशयानं हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 23 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपल्या प्रतिक्रिया देते. यावेळी देखील तिने असाच एक चकित करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक भेळपुरीच्या एका प्लेटसाठी एकमेकांविरोधात लाठीहल्ला करताना दिसत आहेत. भारतातील WWE अशा आशयानं हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. (fight for 1 plate Panipuri) उत्तर प्रदेशमधील बागबत येथे दोन भेळपुरीवाल्यांमध्ये जोरदार भांडण झालं. एका भेळवाल्यानं दुसऱ्या भेळवाल्याच्या गाडीसमोर उभ्या असलेल्या ग्राहकाला स्वत:कडे बोलावलं. यामुळं संतापलेल्या पहिल्या भेळवाल्यानं त्याला शिवीगाळ केली. पुढे यातूनच जोरदार भांडण सुरु झालं. दोन्ही दुकानदार अन् त्यांच्या मित्रमंडळींनी एकमेकांविरोधात जोरदार लाठीहल्ला केला. या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. या मंडळींना पोलिसांनी अटक केली आहे.

जाहिरात

अधुरी प्रेम कहाणी… या अभिनेत्रीमुळं दिलीप कुमार आणि मधुबालांचं झालं नाही लग्न शुल्लक कारणावरुन झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ अभिनेत्री रिचा चड्ढा हिने ट्विट केला आहे. “लोक काल्पनिक घटनांचा दावा करत इतर शहरांवर टीका करतात. म्हणे त्यांच्या शहरांना बदनाम केल जात आहे. परंतु इतरांवर आरोप करताना ही मंडळी स्वत:च्या शहरांना मात्र विसरतात. त्यांनी एकदा आसपास डोकावून पाहावं.” अशा आशयाचं ट्विट करत रिचानं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात