मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अरे, ही तर किरण राव! आमिर खानसोबत घटस्फोटानंतर ओळखू न येण्यासारखी झाली अवस्था

अरे, ही तर किरण राव! आमिर खानसोबत घटस्फोटानंतर ओळखू न येण्यासारखी झाली अवस्था

घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. यापूर्वी दोघेही अनेकदा त्यांचा मुलगा आझादसोबतही दिसले होते. सध्या हे दोघेही मिळून त्यांच्या मुलाचे पालकत्व करत आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 01 ऑक्टोंबर : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव  (Kiran Rao) यांच्या घटस्फोटाच्या (Aamir Khan and Kiran Rao Divorced) बातमीनं अनेकांना धक्का बसला होता. आमिर खान आणि किरण राव यांनी एक व्हिडिओ शेअर करून त्यांच्या या निर्णयाबाबत माहिती दिली. दोघेही त्यांच्या निर्णयावर खूश असल्याचे म्हणाले होते आणि आता दोघांचे एकत्र फोटो व्हायरल होत आहेत.

घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. यापूर्वी दोघेही अनेकदा त्यांचा मुलगा आझादसोबतही दिसले होते. सध्या हे दोघेही मिळून त्यांच्या मुलाचे पालकत्व करत आहेत. आता आमिर आणि किरण राव यांचा एका रेस्टॉरंट बाहेरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

दोघांनीही पापाराझीसमोर एकत्र पोज दिली. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमधील किरण रावचा लूक पाहून लोकांनी विविध प्रश्न केले आहेत.

हे वाचा - आमिर खानचा बॉडीगार्ड आहे मराठमोळा युवराज घोरपडे; पगार ऐकून चाट पडाल!

व्हायरल होत असलेल्या या फोटोत किरण रावचे केस पूर्णपणे पांढरे झालेले आपण पाहु शकतो. तिचा हा लूक पाहून अनेकांनी तिला आरोग्याबाबत सर्व व्यवस्थित आहे, ना असे म्हणत प्रश्न केले आहेत. घटस्फोटानंतर ती आता म्हातारी दिसू लागली आहे, असे एकानं म्हटलंय. तर काहींनी त्यांच्या तुटलेल्या नात्याबाबत थेट प्रश्न केला आहे. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण मग घटस्फोट कसा झाला? घटस्फोटानंतरही ते एकत्र कसे काय दिसत आहेत? असेही काहींनी प्रश्न केले आहेत. किरण रावचा हा नवा वयस्क लूक पाहुन अनेकांना आश्चर्य वाटले. किरण इतकी कशी बदलली असे काहींनी म्हटलंय.

हे वाचा - Dance Deewane Season 3: उर्मिला म्हणाली, रंगीला बघितल्यावर मी चाहत्याप्रमाणं आमिर खानला लिहलं होतं पत्र

घटस्फोट झाला असला तरी हे दोघे अजूनही एकत्र काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात दोघेही ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगनंतर लडाखहून परतल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करून दोघांनी घटस्फोटाची माहिती दिली होती. व्यावसायिकपणे एकत्र काम करू. तसेच, मुलाचे सह-पालकत्व करणार आहेत, असे त्यांनी सांगितले होतं.

First published:

Tags: Aamir khan, Bollywood News