जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: राणू मंडलने गायलं नवं गाणं, Manike Mange Hite मुळे पुन्हा होतेय ट्रेंड

VIDEO: राणू मंडलने गायलं नवं गाणं, Manike Mange Hite मुळे पुन्हा होतेय ट्रेंड

रानू मंडल हिने गायिले Manike Mange Hite गाणे

रानू मंडल हिने गायिले Manike Mange Hite गाणे

गेल्या दोन वर्षापुर्वी लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गावून रातोरात स्टार बनलेली रानू मंडल आता पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या सिंहीनी भाषेतील ‘मनिके मागे हिथे’ (Manike Mange Hite) जगभर व्हायरल झालेले हे गाणे आता राणू मंडल हिच्या आवाजात व्हायरल होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: दोन वर्षापुर्वी लता मंगेशकर (Lata Mangeshkar Song) यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गावून रातोरात स्टार बनलेली राणू मंडल (Ek Pyaar ka Nagma Hai Ranu Mandal) आता पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या सिंहली भाषेतील ‘मनिके मागे हिथे’ (Manike Mange Hite) व्हायरल झालेले हे गाणे आता राणू मंडल (Ranu Mondal New Song) च्या आवाजात व्हायरल होतं आहे. राणू मंडलच्या ‘मनिके मागे हिथे’ या गाण्याचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता राणूचे हे गाणे सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 54 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे वाचा-  Good News! मानसी नाईकने चाहत्यांना दिलं सरप्राइज; अभिनेत्रीने बेबी बम्पसह फोटो.. इतकेच नव्हे तर यामध्ये हे गाणे गाताना राणूने मॉर्डन लुक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत रानूने लाल रंगाचा टी-शर्ट आणि पँट परिधान केली आहे.

जाहिरात

यापूर्वी, म्हणजेच दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर राणू मंडलने लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गायिले होते. यानंतर तिला मुंबईतील ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आमंत्रित करण्यात आलं होते. हे वाचा-  Chahatt Khanna Case: अभिनेत्रीने पतीवर केले होते अनैसर्गिक संभोगाचे आरोप याशोमध्ये जज म्हणून उपस्थित असलेल्या हिमेश रेशमिया यांनी तिच्या गायनाचे कौतुक करून ‘हॅपी हार्डी’ आणि ‘हीर’ या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. यानंतर तिला अनेक चित्रपटात गाणे गाण्याची ऑफर मिळाली. परंतु, दरम्यान रानू मंडल अचानक गायब झाली. याआधी ‘मनिके मागे हिथे’ हे गाणे गायक श्रीलंकेची गायिका योहानीने (Manike Mage Hite Singer) गायिले आहे. या गाण्यावर माधुरी दीक्षितपासून प्रिया बापटपर्यंत अनेकांना यावर Insta Reel करण्याचा मोह आवरलेला नाही. मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं…. सिंहली भाषेतलं. मूळ सिंहली भाषेतलं गाणं 2020 मध्ये रीलिज झालं होतं. ते श्रीलंकन रॅपन आणि गायिका योहानी डीसिल्व्हा हिने सिंहली भाषेतच मे 2021 मध्ये पुन्हा गायलं. अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झालं आणि अर्थातच इथून जगभर. योहानी आणि सतीशन या दोन गायकांनी या गाण्याचं आणखी एक व्हर्जन गायलं. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात