मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘तुम्हीच माझे सुपरहिरो’; साराने सैफला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

‘तुम्हीच माझे सुपरहिरो’; साराने सैफला दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

तुम्हीच माझे सुपरहिरो असं म्हणत तिने सैफवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तुम्हीच माझे सुपरहिरो असं म्हणत तिने सैफवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तुम्हीच माझे सुपरहिरो असं म्हणत तिने सैफवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मुंबई 16 ऑगस्ट: सैफ अली खान (Saif Ali Khan) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. जवळपास गेली तीन दशकं तो विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज सैफचा वाढदिवस आहे. (Saif Ali Khan birthday) 51 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र यामध्ये अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने दिलेल्या शुभेच्छा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तुम्हीच माझे सुपरहिरो असं म्हणत तिने सैफवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सारा ही सैफची मुलगी आहे. "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अब्बा. तुम्ही माझे खरे मित्र आहात. माझे सुपरहिरो आहात. जगातील सर्वात बेस्ट वडिलांना वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा." अशा आशयाची पोस्ट लिहित तिने सैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच वडिलांसोबतचा एक क्युट फोटो देखील शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

शेरशाह: आजही कॅप्टन विक्रम बत्रांच्या आठवणीत रमल्यात डिंपल चीमा; सध्या जगतात असं आयुष्य

रितेश देशमुखचा डिजीटल डेब्यू, Netflix वर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सैफ अली खान आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी खास मालदिव येथे गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेल्या सैफने काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. सैफसोबत करीना कपूर, तैमूर आणि जैह हे देखील मालदिवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत.

First published:
top videos

    Tags: Saif Ali Khan, Sara ali khan