मुंबई, 16 ऑगस्ट : कोरोना काळात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर थिएटर, नाट्यगृह बंद होती. अशात भारतात डिजीटल माध्यमं अधिक प्रसिद्ध झाली. परिणामी अनेक अभिनेतेही OTT प्लॅटफॉर्मकडे वळले. या काळात अनेक बॉलिवूड कलाकारांनी डिजीटल प्लॅटफॉर्मवर, OTT वर आपली एन्ट्री केली. आता या डिजीटल जगात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखही (Riteish Deshmukh) एन्ट्री करणार असून त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची माहिती दिली आहे.
रितेश देशमुख अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत (Tamannaah Bhatia) OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) झळकणार आहे. Plan A Plan B या रोमॅन्टिक चित्रपटातून रितेश आणि तमन्ना ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Plan A Plan B चं शशांका घोष दिग्दर्शन करणार आहेत. सध्या ते कार्तिक आर्यन आणि आलया फर्निचरवालासह Freddy या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. शशांका घोष हे त्यांच्या वीरे दी वेडिंग आणि खुबसूरत या चित्रपटांसाठी ओळखले जातात. तसंच रजत अरोरा यांनी Plan A Plan B चं लेखन केलं असून वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, डर्टी पिक्चर, किक, गब्बर इज बॅक अशा चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. आता लेखक रजत अरोरा निर्मितीकडेही वळले असून लवकरच नेटफ्लिक्सवर प्रीमियरसाठी ते सज्ज झाले आहेत.
डिजीटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिकवर एन्ट्री करत असून यासाठी अतिशय उत्साही असल्याची भावना रितेशने व्यक्त केली असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याने एक पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
लवकरच Plan A Plan B 190 देशांमध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Netflix, OTT, Ritesh deshmukh