Home /News /entertainment /

सैफ-अमृताने लग्नाच्या 13 वर्षानंतर घेतला होता घटस्फोट; नवाबनं अभिनेत्रीला दिली होती मोठी रक्कम

सैफ-अमृताने लग्नाच्या 13 वर्षानंतर घेतला होता घटस्फोट; नवाबनं अभिनेत्रीला दिली होती मोठी रक्कम

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन सैफ आणि अमृताने केला होता प्रेमविवाह.

  मुंबई 12 जून : अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) चित्रपटांइतकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतो. सैफने दोन मुलं झाल्यानंतर अमृता सिंगला (Amrita Sigh) घटस्फोट दिला होता. त्यामुळे त्यांच्या या घटस्फोटोच्या बातम्या काही काळ विशेष चालल्या होत्या. विशेष म्हणजे सैफ आणि अमृता यांनी प्रेमविवाह केला होता तोही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. 1991 साली सैफ आणि अभिनेत्री अमृताने विवाह केला होता. तर 2004 साली त्यांनी सैफच्या विवाहबाह्य संबधामुळे (Extra marital affairs) वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सैफच्या अफेअर्सच्या बातम्या सतत अमृताच्या कानावर पडत होत्या  त्यामुळे तिने सैफ पासून वेगळं होण्याचं ठरवलं. याशिवाय तिने दोन्ही मुलं म्हणजेच सारा (Sara Ali Khan) आणि इब्राहीमला (Ibrahim Ali Khan) स्वतःसोबत घेऊन गेली.
  या घस्फोटानंतर अमृताने तिला पोटगी रक्कम न मिळाल्याचा आरोप केला होता. त्यावर सैफने तिला 5 कोटी रुपये द्यायचे असल्याचं म्हटलं होतं. पण त्यातील अर्धी रक्कम आधीच दिली आहे. तर उर्वरीत रक्कम ही एक एक लाख रुपये या स्वरुपात प्रतिमाहिना दिला जाईल असं सैफने सांगितलं होतं. व ही रक्कम मुलगा 18 वर्षाचा होईपर्यत दिली जाईल असही तो म्हटला होता. सैफ म्हणाला होता, “मी कोणी शाहरुख खान नाही. माझ्याकडे एकत्र एव्हढे पैसे नाहीत. पण मी सगळे पैसे चुकते करणार आहे. मी तिचा आदर करतो.”

  नुसरत जहाचा बेबी बम्प PHOTO VIRAL; अभिनेत्री गर्भवती असल्याची बातमी खरी

  पुढे सैफने असही सांगितलं होतं की अमृता घस्फोटानंतर मुलांना घेऊन गेली होती तर त्यांना भेटण्याचीही त्याला परवानगी नव्हती. तेव्हा पॉकेटमधील मुलांचा फोटो पाहून तो रडायचा. त्यावेळी सैफने एका मुलाखतीत हे खुलासे केले होते. आता मात्र संपूर्ण खान कुटुंब अनेकदा एकत्र पाहायला मिळंत. सैफने 2012 साली करीना कपूरसोबत (Kareena Kapoor) लग्न केलं होतं. त्यांनाही आता दोन मुलं आहेत. तर सैफ त्याची अमृताची मुलं म्हणजेच सारा आणि इब्राहीमवरही तितकचं प्रेम करताना दिसतो.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Saif Ali Khan, Sara ali khan

  पुढील बातम्या