Home /News /entertainment /

HBD: 'लिहून देते, कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही' तापसीने घेतला हा निर्णय, पाहा काय होतं कारण

HBD: 'लिहून देते, कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही' तापसीने घेतला हा निर्णय, पाहा काय होतं कारण

मॉडेलिंग पासून आपलं करिअर सुरू कऱणारी तापसी आज साउथ ते बॉलिवूड एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. वाढदिवसानिमित्त पाहा तिच्याविषयी खास गोष्टी.

  मुंबई 1 ऑगस्ट : आपली स्पष्ट मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आजवर चित्रपटांत अनेक दमदार भूमिका तिने साकारल्या आहेत. मॉडेलिंग पासून आपंल करिअर सुरू कऱणारी तापसी आज साउथ ते बॉलिवूड एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. 1 ऑगस्ट 1987 ला तापसीचा दिल्लीत जन्म झाला होता. तिचे वडील हे रियल इस्टेट एजंट होते. तर आई गृहीनी आहे. तापसीने दिल्लीतच तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं. ती कम्प्युटर इंजिनीयरिंगची विद्यार्थीनी होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तापसीने काही दिवस कामही केलं. पण तिला मॉडेलिंगमध्ये रस होता. तेव्हा तिने काही सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. फेमिना मिस इंडियाची ती बेस्ट स्किन या टायटलची मानकरी ठरली होती. यानंतर तिने अभिनयाकडे वाटचाल सुरू केली होती. नुकताच तिचा हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

  तापसी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती तिची ठाम मतं मांडते. मग ती फिल्मी असो किंवा राजकीय. तापसीने तिच्या रिलेशनशिप विषयी देखील एका मुलाखतीत ठाम मत मांडलं होतं. 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत लाइफ पार्टनर विषयी बोलताना तापसी म्हणाली होती,” मी कधीच कोणत्या स्टारला डेट केलं नाही. आणि कधीच कोणाला करणारही नाही, आणि हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते.” असं तापसी म्हणाली होती.
  View this post on Instagram

  A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

  याचं कारणही तिने पुढे सांगितलं होतं, ती म्हणाली होती, “कारण या बाबतीत मी अतिशय स्पष्ट आहे की, माझ्याशिवाय रिलेशनशिपमध्ये कोणीही स्टार नसेल. मला स्वतःला असं वाटंत की एक अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात काही होऊ शकेन.” एका अभिनेत्याला डेट किंवा लग्न करण्याचं हे कारण तापसीने सांगितलं होतं.

  छोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा

  सध्या तापसी एका बॅडमिंटन प्लेयरला डेट करत आहे. मॅथियस बो असं त्याचं नाव आहे. डेन्मार्कचा रहिवाशी असणारा मॅथियस आणि तापसी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तापसीने आपल्या अभिनयाने लाखो चाहते निर्माण केले आहेत. पिंक, मुलुख, मिशन मंगळ ते आता हसीन दिलरुबा अशा अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. सोशल मीडियावरही तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Taapsee Pannu

  पुढील बातम्या