मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ट्रोलर्सनी लिसाच्या मुलांनाही नाही सोडलं; अभिनेत्रीने सणसणीत उत्तर देत केली बोलती बंद

ट्रोलर्सनी लिसाच्या मुलांनाही नाही सोडलं; अभिनेत्रीने सणसणीत उत्तर देत केली बोलती बंद

अभिनेत्री लिसा हेडनला (Lisa Haydon) देखील ट्रोल करण्यात आलं तेव्हा तिने ट्रोलरला सणसणीत उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री लिसा हेडनला (Lisa Haydon) देखील ट्रोल करण्यात आलं तेव्हा तिने ट्रोलरला सणसणीत उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री लिसा हेडनला (Lisa Haydon) देखील ट्रोल करण्यात आलं तेव्हा तिने ट्रोलरला सणसणीत उत्तर दिलं आहे.

मुंबई 1 ऑगस्ट : सोशल मीडियावर सध्या ट्रोलिंगचा (Trolling) ट्रेंड सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींना टीकेचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्री लिसा हेडनला (Lisa Haydon) देखील सध्या अशाच पद्धतीने ट्रोल करण्यात आलं तेव्हा तिने ट्रोलरला सणसणीत उत्तर दिलं आहे. दरम्यान यावेळी त्या ट्रोलरने लिसाच्या मुलांवरही निशाना साधला. त्यावर लिसाने उत्तर दिलं आहे.

दरम्यान सोशल मीडियावर अनेक सेलिब्रीटी विविध गोष्टींच प्रमोशन करताना दिसतात. तर लिसा एका ब्युटी क्रीमचं प्रमोशन करत होती. लिसाचे हे फोटो पाहून एका युझरने लिहिलं की, ‘लिसा हेडन केमिकल विकून लोकांचं आयुष्य बरबाद करणं बंद कर, तुझ्या फॉलोवर्सना वेडं बनवशील तर तुझ्या मुलांना शाप लागेल.’

View this post on Instagram

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

त्यानंतर लिसाने देखील ही कमेंट पाहीली आणि तिनेही यावर कमेंट करत उत्तर दिलं आहे. तिने यावर ‘वाओ’ (Woww) असं लिहींत शांतपणे सणसनीत उत्तर दिलं आहे. यानंतर लिसाचे अनेक फॅन्स देखील तिच्या समर्थनात उतरले. (Lisa Haydon trolled)

HBD : छोट्या पडद्यावर मिळवली प्रसिद्धी; मराठमोळी मृणाल ठाकूर अशी झाली बॉलिवूड अभिनेत्री

View this post on Instagram

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

दरम्यान काही दिवसापूंर्वीच लिसा तिसऱ्यांदा आई झाली आहे. यावेळी तिने एका मुलीला जन्म दिला. याआधी तिला दोन मुलं आहेत. ऑक्टोबर 2016 साली तिने दिनो ललवानीशी विवाह केला होता. एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी विवाह केला होता.

2017 साली लिसाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर 2020 साली तिच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. आपल्या मुलांसोबत ती नेहमीच सोशल मीड़ियावर फोटो शेअर करत असते. तिने अनेक प्रेग्नंसी फोटी शेअर केले होते.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment