जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लढा कोरोनाशी! अभिनेत्री सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात

लढा कोरोनाशी! अभिनेत्री सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात

लढा कोरोनाशी! अभिनेत्री सई ताम्हणकरने दिला मदतीचा हात

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार, सलमान खान, सुपरस्टार रजनीकांत यासांरख्या अनेक कलाकारांनी मोठी मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता मराठी कलाकारांनीही कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी मदत करण्यास सुरूवात केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च : सध्या महाराष्ट्रात कोरोनाची भीती वाढत आहे. भारतात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र आणि त्यानंतर जवळपास केरळसह इतर राज्यांमध्ये आढळले आहेत. त्यातही मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आह. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार, सलमान खान, सुपरस्टार रजनीकांत यासांरख्या अनेक कलाकारांनी मोठी मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता मराठी कलाकारांनीही कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी मदत करण्यास सुरूवात केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 1.5 लाखांची मदत जमा केली आहे. (हे वाचा- आज जो काही आहे तो भारतीयांमुळेच… अभिनेत्यानं केली 1 कोटींची मदत ) महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत जरी असली, तरी आतापर्यंत 34 जणांनी या रोगावर मात देखील केली आहे. त्यामुळे कोरोनाला हरवणं शक्य आहे. अशा परिस्थितीत या सर्व कलाकारांनी केलेली मदत मोलाची ठरत आहेत. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सुद्धा कोरोनाबाबत खबरदारी घेण्याबाबतचा व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी सर्वांना घरीच राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

(हे वाचा- लॉकडाऊनमुळे फार्म हाऊसवरच सलमानने साजरा केला भाचा अहिलचा वाढदिवस ) कलाकारांप्रमाणेच अनेक उद्योगपती देखील कोट्यवधीची मदत कोरोनाविरोधातील या युद्धासाठी देत आहेत. यामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी, अनिल अग्रवाल, आनंद महिंद्रा, सुधा मूर्ती यांसारखी अनेक नावं जोडली गेली आहेत. या सर्वांच्या प्रयत्नातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून कोरोनाशी लढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात