आज जो काही आहे तो भारतीयांमुळेच... अभिनेत्यानं केली 1 कोटींची मदत

आज जो काही आहे तो भारतीयांमुळेच... अभिनेत्यानं केली 1 कोटींची मदत

बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनही कोरोनाग्रस्तांना दिला मदतीचा हात.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च: कोरोनासोबत लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत देण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी आणि कलाकारांनी आपल्याजवळी काही रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचाही समावेश आहे. बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यनही मागे राहिला नाही. त्यानंही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पैसे देत मदतीचा हात दिला आहे.

कार्तिक आर्यनने ट्विट करताना म्हटलं की, देशासाठी सध्या एकत्र येऊन काही तरी करण्याची वेळ आली आहे. आज मी जो काही आहे, जे काही कमावलं आहे ते या भारतीयांमुळेच ... म्हणूनच मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत करत आहे. तुम्हालाही विनंती करतो की जितकी मदत करता येईल तितकी नक्की करा.

हे वाचा-कोरोना लॉकडाऊन-या 3 महिन्यात वीजबिल भरण्यास विलंब झाला तरी नाही भरावा लागणार दंड

बॉलिवूड कारकिर्द फार मोठी नसलेल्या कार्तिक आर्यनने मोजकेच चित्रपट केले आहेत. त्यात प्यार का पंचनामा, लव आज कल, लुका छुपी, पती पत्नी और वो या चित्रपटांचा समावेश आहे. कार्तिक आर्यनने केलेल्या या मदतीचं कौतुक चाहत्यांकडून केलं जात आहे. कार्तिक आर्यनशिवाय इतरही अनेक बॉलिवूड कलाकार कोरोनाच्या लढ्यात मदतीसाठी सरसावले आहेत. अक्षय कुमारने 25 कोटींची आर्थिक मदत केली आहे. तसंच रितेश देशमुख, हृतिक रोशन, रिचा चढ्ढा यांच्यासह इतर कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

हे वाचा-BREAKING : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी, 52 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

First published: March 30, 2020, 2:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading