मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sai Tamhankar: सईचं दौलतरावांवर प्रेम उतू; बर्थडे निमित्त बॉयफ्रेंडला दिल्या खास शुभेच्छा!

Sai Tamhankar: सईचं दौलतरावांवर प्रेम उतू; बर्थडे निमित्त बॉयफ्रेंडला दिल्या खास शुभेच्छा!

मराठीच्या परमसुंदरीने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एका क्युट आणि गोड पोस्टमधून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

मराठीच्या परमसुंदरीने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एका क्युट आणि गोड पोस्टमधून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

मराठीच्या परमसुंदरीने तिच्या बॉयफ्रेंडसाठी एका क्युट आणि गोड पोस्टमधून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

मुंबई 2 जुलै: इंडस्ट्री कोणतीही असो कलाकारांच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घ्यायला सगळ्यांनाच रस असतो. कलाकार सुद्धा अगदी बिनधास्तपणे आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. विशेषतः त्यांच्या रिलेनशिपबद्दल काही कलाकार गुप्तता बाळगतात तर काही त्याबद्दल खुलेपणाने अपडेट्स देताना दिसतात. सई ताम्हणकरने (Sai Tamhankar relationship status) सुद्धा काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून आपल्या रिलेशनशिप बद्दल खुलासा केला होता. तिच्या बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसानिमित्त सईने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सई अनिश जोग या तिच्या जुन्या मित्राला ती डेट करत (Is Sai Tamhankar dating) असून तिने काहीच महिन्यांपूर्वी आपल्या या खास रिलेशनबद्दल चाहत्यांना अपडेट दिला होता. त्या पोस्टमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडचा (Sai Tamhankar boyfriend) दौलतराव असा उलेख केला होता. तेव्हपासून सईचे चाहते त्याला दौलतराव असंच संबोधताना दिसतात. आज सईच्या दौलतरावांचा बर्थडे असून सईने त्यानिमित्त एक गोड पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

यात सई असं लिहिते, “Happy Birthday You ♥️!

May all your dreams and wishes come true and my your scanners be as sharp forever 💕

@anishjoag ! #purest #main #sukh”

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

सईची (Sai Tamhankar Instagram) अनिशबद्दल लिहिलेली पोस्ट सध्या बरंच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सईच्या चाहत्यांनी सुद्धा दौलतरावांच्या बर्थडे निमित्त केलेल्या पोस्टवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. अनेक कलाकारांनी सुद्धा या पोस्टवर कमेंट केली आहे. सईच्या वाढदिवशी अनिशने तिच्यासाठी एक खास रील शेअर केलं होतं. त्यावर ‘Love you’ अशी कमेंट करत सईने आपलं प्रेम दर्शवलं होतं. कायमच बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाने प्रेक्षकांची लाडकी बनलेली सई तिच्या पर्सनल लाईफबद्दल सुद्धा फार खुल्या विचारांची आहे. जिथे काही कलाकार लग्न होईपर्यंत अगदी आपल्या रिलेशनबद्दल गुप्तता बाळगताना दिसतात तिथे सई तिच्या दिलखुलास अंदाजामुळे पसंत केली जाते.

हे ही वाचा- Aaditi Pohankar exclusive: शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?

 सईने नुकतंच नवं घर खरेदी केलं आणि त्याच गणेशपूजन सुद्धा पार पडलं. अनिशने या गणेशपूजनाचा फोटो टाकून सईचं अभिनंदन केलं होतं. तसंच त्याला खूप अभिमान आहे असं सुद्धा तो म्हणाला होता. सई वर्क फ्रंटवर सध्या बरीच जोशात आहे. तिचे एकामागून एक अनेक सुंदर प्रोजेक्ट सध्या रिलीज होत आहेत.

First published:
top videos

    Tags: Actress, Birthday celebration, Marathi entertainment, Relationship, Sai tamhankar