मुंबई 1 जुलै: मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकरचं (Aaditi Pohankar) नाव सध्या सॉलिड गाजताना दिसत आहे. (SHE season 2) तिच्या She या वेबसीरिजमधल्या कामामुळे तिचं नाव सध्या सारखंच हेडलाईनमध्ये येताना दिसत आहे. आदितीने या रोलसाठी बरीच मेहनत घेतली तसंच तिला अनेक संकटांचा सुद्धा सामना करावा लागला. या सगळ्या गोष्टींबद्दल आदिती News18 लोकमतला दिलेल्या exclusive मुलाखतीत बोलताना दिसली.
आदिती पोहनकर ही एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिची फॅमिली संपूर्णपणे athelete असल्याने तिचा खेळाकडे कल अधिक होता पण तरीही अभिनय क्षेत्रात मोठ्या कष्टाने ती इथवर पोहोचली आहे. (She on Netflix) She या सिरीजच्या दुसऱ्या सीजन दरम्यान तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
“शूटिंगचा पहिला आठवडा माझ्यासाठी कठीण होता. माझा आणि भूमीचा ऍक्सेंट वेगळा असल्याने मला तो पकडायला थोडा वेळ लागला. मला भीती ही होती की पहिल्या सीजनला एवढं भरभरून प्रेम मिळाल्यानंतर प्रेक्षक माझ्याकडून काय अपेक्षा करतात याचं मला थोडंसं दडपण होतं. कारण त्यांना कोणतंच कारण किंवा सफाई मी देऊ शकत नाही. या भूमिकेला बऱ्याच शेड्स आहेत. जिकडे जिकडे भूमी कमजोर पडते तिकडेच नंतर ती ठामपणे उभी राहते. जेव्हा तिच्या नवऱ्यासोबतचे सीन्स होते तेव्हा मी तिची कमजोरी आठवून त्याच ऊर्जेने उलट वागायचे ती कमजोरी मला कायम ऊर्जा देत होती. या सिजनच्या शूटिंग दरम्यान बऱ्याच अडचणी आल्या.
View this post on Instagram
जसं शूटिंग सुरु झालं एक आठवड्यात महामारीची लाट उफाळून आली. पहिले तर कोव्हिडची लाट, त्यात त्यानंतर आलेला पाऊस, दरम्यान शूटिंगमध्ये गॅप पडली. त्याच दरम्यान माझ्या दुसऱ्या सिरीजचं शूटिंग सुरु झालं ज्यात माझी भूमिका अख्खीच वेगळी होती. त्या दरम्यान माझ्या वडिलांचं निधन झालं अशा अनेक गोष्टींना मी सामोरी जात होते. पण परत आल्यावर माझ्या हातात होतं बॅक टू बेसिक येऊन स्क्रिप्ट पुन्हा वाचणं. मी स्क्रिप्टवर एवढं काम केलं की रद्दीत विकायला सुद्धा ती कोणी नेऊ शकत नाही अशी तिची अवस्था झाली होती.”
She मधील भूमिका परदेशी हे पात्र साकारणं तिच्यासाठी खूपच अवघड होतं. आज नेटफ्लिक्सवरील ही सिरीज ग्लोबल टॉप 10 सिरीजमध्ये गणली जात आहे. भमिका परदेशीचा हा प्रवास लोकांना फारच भावतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News, Marathi actress, Netflix