मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /टीव्ही मालिकांची निर्माती आहे देशातील सर्वात श्रीमंत महिला, 3 लाख कोटींची कंपनी; एकूण नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

टीव्ही मालिकांची निर्माती आहे देशातील सर्वात श्रीमंत महिला, 3 लाख कोटींची कंपनी; एकूण नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

एचसीएल टेक्नोलॉजीजची (HCL Technologies) चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा (Roshni Nadar Malhotra) या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.

एचसीएल टेक्नोलॉजीजची (HCL Technologies) चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा (Roshni Nadar Malhotra) या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.

एचसीएल टेक्नोलॉजीजची (HCL Technologies) चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा (Roshni Nadar Malhotra) या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 मार्च- Roshni Nadar Story : एचसीएल टेक्नोलॉजीजची (HCL Technologies) चेअरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा (Roshni Nadar Malhotra) या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. रोशनी नाडर मल्होत्रा यांचा नेटवर्थ 84,330 कोटी इतका आहे.

रोशनी नाडर या भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी चालवताता. या कंपनीची मार्केट व्हॅलू 3 लाख करोड इतकी आहे. एचसीएल कंपनीची स्थापन त्यांचे वडील शिव नाडर यांनी 1976 मध्ये केली होती. एक बिजनेसवुमन म्हणून त्यांना सर्वजण ओळखतात. याशिवाय त्यांना शास्त्रीय संगीताची देखील आवड आहे. . नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांची पदवी कम्युनिकेशन फील्डमधून असून त्यात त्यांनी प्रामुख्याने रेडिओ, टीव्ही आणि चित्रपटांविषयी अभ्यास केला आहे.

वाचा-'अक्षय कुमार त्याच्या गर्लफ्रेंडला रात्री उशीरा घेऊन ..' शिल्पानं केली भांडाफोड

आपल्यावर असलेली व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी चोख पार पाडण्यासाठी रोशनी नादर मल्होत्रा यांनी कॅटलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवीही मिळवली आहे. त्या शिव नाडर फाऊंडेशनच्या विश्वस्त असून त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे. फोर्ब्सने 2020 मध्ये जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी 55 व्या स्थानावर होत्या. रोशनी नाडर या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी लिस्टेड आयटी कंपनीचा कार्यभार स्वीकारला आहे.

टीव्ही शोच्या देखील आहेत निर्मात्या

रोशनी नाडर यांच्या खांद्यावर एचसीएल कंपनीचा भार जरी असला तरी त्यांचं सिनेमावरील प्रेम कमी झालेलं नाही. त्यांनी एक अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कवरीसाठी ब्रिंक नावाच्या एका टीव्ही सीरिजची निर्मिती केली आहे. 2022 मध्ये वटवाघळांच्यावर आधरित केलेल्या एका भागाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार देखील मिळाला आहे. तसेच त्यांनी लहान मुलांसाठी हल्का नावाच्या एका सिनेमाची निर्मिती देखील केली आहे.

पर्सनल आयुष्य

रोशनी नाडर मल्होत्रा यांच्या नवऱ्याचं नाव शिखर मल्होत्रा आहे. ते एचसीएल हेल्थचे उपाध्यक्ष आहेत. 2009 मध्ये त्यांचे लग्न झाले. रोशनी आणि शिखर यांना दोन मुले आहेत. एका मुलाचे नाव अरमान (जन्म 2013) तर दुसऱ्या मुलाचे नाव जहान (2017) आहे. रोशनी नाडर यांनी दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. रोशनी एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या डीनच्या सल्लागार परिषदेच्या सदस्याही आहेत. रोशनी या शिव नाडर आणि किरण नाडर यांची एकुलती एक मुलगी आहे. रोशनी यांनी देश-विदेशातील अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Tv serial