मुंबई, 20 मार्च- अक्षय कुमार त्याच्या अभिनया इतकातच बॉलिवूडमध्ये त्याच्या ‘प्लेयर बॉय’ इमेजसाठी ओळखळा जातो. अक्षयने 90 च्या दशकात बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींना डेट केलं आहे. अनेकवेळा तर या सगळ्या गोष्टी लग्नापर्यंत देखील पोहचल्या होत्या. त्याकाळात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीच्या रिलेशनशिपची देखील जोरदार चर्चा रंगली होती. मात्र या दोघांचं नातं देखील जास्त काळ टिकू शकलं नाही.
शिल्पा शेट्टीनं 2000 साली फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिनं तिचं आणि अक्षयचं ब्रेकअप कशामुळं झालं यांच कारण सांगितलं होतं. अक्षयसोबतच्या नात्यावर ती पहिल्यांदाच जाहीरपणे बोलली होती. तिचं अक्षयवर प्रेम होतं, पण त्यानं कधीच कुणावर खरं प्रेम केलं नव्हतं. तो शिल्पा शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाच ट्विंकल खन्नालाही डेट करत होता.
वाचा-शाहिरांची वाणी पुन्हा घुमणार; 'महाराष्ट्र्र शाहीर' चा दमदार टीझर रिलीज
शिल्पाच्या आयुष्यातील कठीण काळ
खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्यातील नात्याबाबत जेव्हा शिल्पाला समजलं तेव्हा ती खूप निराश झाली. तिने आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. परंतु, मी आता या सगळ्यातून बाहेर पडले आहे याचा मला आनंद आहे. प्रत्येक काळ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. माझं फिल्मी करियर चांगलं चाललं होतं, पण खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते."
प्रत्येक गर्लफ्रेंडला लग्नाचं वचन
शिल्पा पुढे म्हणते, "आता असं वाटतंय की, सगळं खूप मागं पडलंय." तिनं सांगितलं की, अक्षयनं आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी एक खास युक्ती वापरत होता. तो रात्री उशिरा आपल्या गर्लफ्रेंडला मुंबईतील सिद्धी विनायक मंदिरात घेऊ जात असे आणि तिला लग्नाचं वचन देत असे. पण जेव्हा अक्षयच्या आयुष्यात नवीन मुलीची एंट्री झाली की तो त्याचं वचन विसरून जात होता.
अक्षयचं नाव शिल्पा शेट्टीच्या आधी रवीन टंडन तसेर रेखा यांच्यासोबत देखील जोडलं गेलं होतं. रवीन टंडनसोबत तर अक्षयनं साखरपुडा देखील केला होता. दोघं लग्न देखील करणार होते. रवीनाला जेव्हा अक्षयच्या अफेयरबद्दल समजलं तेव्हा त्याचं लग्न मोडलं.
शिल्पा शेट्टीनं आता राज कुंद्रासोबत लग्न केलं आहे. तिला राजपासून दोन मुलं आहेत. ती तिच्या आयुष्यात सुखी आहे. तर अक्षयनं देखील ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं आहे. अक्षयला देखील दोन मुलं आहेत. य़ा दोघांचा देखील सध्या सुखाचा संसार सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment