जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूड नाही तर या क्षेत्रात नाव कमवणार राहा कपूर; आलियाने सांगितला 8 महिन्यांच्या लेकीचा करिअर प्लॅन

बॉलिवूड नाही तर या क्षेत्रात नाव कमवणार राहा कपूर; आलियाने सांगितला 8 महिन्यांच्या लेकीचा करिअर प्लॅन

आलिया भट्ट

आलिया भट्ट

आलिया भट्टने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. अलीकडेच तिने आता आपली मुलगी राहाच्या करिअर प्लॅनचा खुलासा केला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21  जुलै : अभिनेत्री आलिया भट्ट वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. येणाऱ्या काळात अभिनेत्री करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटात झळकणार आहे. सध्या तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यादरम्यान, चित्रपटाव्यतिरिक्त आलियाने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या. अलीकडेच तिने आता आपली मुलगी राहाच्या करिअर प्लॅनचा खुलासा केला. आलिया भट्टने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या स्टार कपलने लेकीचं नाव राहा असं ठेवलं आहे. आलियाची लेक राहा फक्त आठ महिन्यांची आहे. तिचा चेहरा अजूनही सगळ्यांपासून लपवून ठेवलेला आहे. आलियाने आपल्या आठ महिन्यांच्या लेकीचं करिअर आधीच प्लॅन केलं आहे. अनेकदा स्टार्सची मुलं फिल्मी दुनियेतच एन्ट्री घेतात. पण, राहाबाबत आलियाची योजना वेगळी आहे.नुकतंच तिने राहा भविष्यात काय बनेल याविषयी खुलासा केला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाला राहाविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आलिया म्हणाली, “मी तिला म्हणते, तू तर शास्त्रज्ञच बनशील.” तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘म्हणजे ती चित्रपटात शास्त्रज्ञची भूमिका साकारणार’, असं एकाने उपरोधिकपणे लिहिलं. तर करण जोहरच आलियाच्या मुलीला बॉलिवूडमध्ये लाँच करणार, अशी भविष्यवाणीच दुसऱ्या युजरने केली. आलियाने लेकीविषयी केलेला हा खुलासा ऐकून सगळेच चकित झाले आहेत. Pm Modi Biopic: पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणार बॉलिवूडचा शेहनशाह? बायोपिकबद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा मुलीच्या जन्मानंतर आलियाने करिअर बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. आलिया आता करिअरपेक्षा जास्त लक्ष राहाकडे देणार आहे. त्यामुळे ती वर्षातून एखादाच चांगला चित्रपट करेन असं तिनं सांगितलं होतं. राहाला सध्या आईची सर्वात जास्त गरज आहे त्यामुळे मी तिला जास्त वेळ देईन असा खुलासा आलियाने केला होता.

जाहिरात

मुलगी राहाच्या जन्मानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा आलियाचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात आलिया-रणवीर सिंग व्यतिरिक्त धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर आहे जो बऱ्याच काळानंतर दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात