जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ved Box Office Collection: 'वेड'नं मोडले सगळे रेकॉर्ड, एका दिवसाची कमाई 5 कोटी; एकूण आकडा पाहून वेड लागेल

Ved Box Office Collection: 'वेड'नं मोडले सगळे रेकॉर्ड, एका दिवसाची कमाई 5 कोटी; एकूण आकडा पाहून वेड लागेल

वेड सिंगल डे कलेक्शन

वेड सिंगल डे कलेक्शन

केवळ विकेंडला नाही तर विक डेजला देखील सिनेमानं बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाची एका दिवसाची कमाई पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 09 जानेवारी: नव्या वर्षाची सुरूवात झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र फक्त एकच गाणं म्हणतोय ते म्हणजे ‘मला वेड लावलंय लावलंय’. अभिनेते रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड या सिनेमानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. ‘वेड’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसतोय. बॉक्स ऑफिसवर वेडनं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत त्यानं सर्वांना वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. वेड सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 30 करोडचा टप्पा पार केला आहे. केवळ विकेंडला नाही तर विक डेजला देखील सिनेमानं बक्कळ कमाई केली आहे. सिनेमाची एका दिवसाची कमाई पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्यात. अभिनेता रितेश देशमुखचा वेड प्रदर्शित झाला असला तरी त्याचं प्रमोशन काही थांबलेलं नाहीये. मला वेड लागलंय या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राला तालावर नाचवलंय. याच तालावर नाचणाऱ्या प्रेक्षकांनी आठवड्याच्या शेवटी थिएटरमध्ये गर्दी करत नवा रेकॉर्ड तयार केला आहे. एका दिवसाला वेडनं 5.70 करोडची कमाई केली आहे. एका दिवसाच्या या कमाईनं सगळेच अवाक झालेत. हेही वाचा - टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा ‘तुझे मेरी कसम’? 20 वर्षांनी कारण आलं समोर रितेशनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं ही माहिती दिली आहे. वेड सिनेमानं रविवारी 08 जानेवारी या एका दिवसात 5.701 करोडचा गल्ला जमवला आहे.  ‘प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार… वेड चित्रपटाला आपलं प्रेम आणि आशिर्वाद असाच लाभू द्या. 10 व्या दिवशी मराठी सिनेमानं  आतापर्यंतचा सर्वाधिक एक दिवसाचं कलेक्शन केलं आहे.  हे स्वप्नासारखे वाटतं, वेड वर एवढ्या प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो’, असं रितेशनं म्हटलं आहे.

    जाहिरात

    फिल्म क्रिटीक तरण आदर्श यानं दिलेल्या माहितीनुसार, वेड हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक दिवशी तगडी कमाई करतोय. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत वेडनं दुसऱ्या आठवड्यात 12.75 करोडची सर्वाधिक कमाई केली आहे. शुक्रवारी सिनेमानं 2.52 करोड कमावले तर शनिवारी 4.53 करोड कमावले आणि दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी सिनेमा 5.70 करोडची कमाई केली. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 33.42 करोड रुपये कमावलेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    रितेश आणि जिनिलिया यांचा हा पहिला एकत्रित मराठी सिनेमा आहे. 30 डिसेंबर2022ला सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्याबरोबर सिनेमात अभिनेते अशोक सराफ, शुंभकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात