जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ...तर आम्हालाही वेड लागेल; रितेश जिनिलियानं तुळजाभवानी चरणी घातलं साकडं

...तर आम्हालाही वेड लागेल; रितेश जिनिलियानं तुळजाभवानी चरणी घातलं साकडं

रितेश देशमुख

रितेश देशमुख

महाराष्ट्राची कुळस्वामीनी असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरात आजपासून शांकबरी नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. आजच्या चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढून रितेश आणि जिनिलिया यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 डिसेंबर  : वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांसाठी अभिनेता रितेश देशमुख नं खास मेजवानी आणली आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेड’ हा सिनेमा 30डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून रितेश पहिल्यांदा दिग्दर्शन करत आहे. तसंच रितेश आणि जिनिलिया पहिल्यांदा मराठी सिनेमात एकत्र काम करणार आहेत. दोघांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी दोघांचे चाहते आतूर आहेत.  सिनेमा रिलीज होताच रितेश आणि जिनिलिया यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं. दोघांनी जोड्यानं देवीचं दर्शन घेत आरती केली. तुळजाभवानीच्या पायावर डोक ठेवत मागणं मागितलं. माध्यमांशी बोलताना रितेशनं त्याच्या मनातील गोष्ट सांगितली. महाराष्ट्राची कुळस्वामीनी असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरात आजपासून शांकबरी नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. आज दुपासी12 वाजता देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. या नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. आजच्या चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढून रितेश आणि जिनिलिया यांनीही दर्शन घेतलं.  रितेश आणि जिनिलियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. हेही वाचा - Ritesh Genelia Exclusive: पाणी पुरी की पिठलं भाकरी? देशमुखांच्या सुनेला आवडतात या गोष्टी

माध्यमांशी बोलताना रितेश म्हणाला, ‘आयुष्यात कोणतंही नवीन कार्य करतो तेव्हा नेहमी तुळजापूरला येऊन देवीचं दर्शन घेतो. वेडच्या निमित्तानं दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा काम करतो आहे. त्यामुळे देवीचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे’.  रितेश पुढे म्हणाला, ‘लोकांनी सिनेमा पाहावा. ते जर सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात गेले तर आम्हालाही वेड लागेल’. रितेश आणि जिनिलिया यांचा मराठीतील पहिलाच एकत्र सिनेमा आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यानंतर सिनेमातील गाणी देखील सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. ‘वेड तुझे’, आणि ‘वेड लावलंय वेड लावलंय’ ही दोन गाणी तूफान गाजतायत. सिनेमात रितेश आणि जिनिलिया यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही असणार आहे. सलमान खान आणि रितेश यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं मला वेड लावलंय हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात