जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ritiesh Deshmukh चं वजन एवढं वाढलं की शर्टाचं बटणही लागेना, तरीही जेवणावर मारलाय ताव! पाहा VIDEO

Ritiesh Deshmukh चं वजन एवढं वाढलं की शर्टाचं बटणही लागेना, तरीही जेवणावर मारलाय ताव! पाहा VIDEO

Ritiesh Deshmukh चं वजन एवढं वाढलं की शर्टाचं बटणही लागेना, तरीही जेवणावर मारलाय ताव! पाहा VIDEO

Riteish Deshmukh Viral Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रितेश त्याच्या पुढ्यात वाढण्यात आलेल्या जेवणावर ताव मारत आहे. तो खाण्यात एवढा गुंगं झालाय की वाढलेल्या पोटामुळे त्याच्या शर्टाची बटणं निघाली आहेत, हे देखील रितेशच्या ध्यानात येत नाही आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 एप्रिल: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh Upcoming Movie) हे मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे. दरम्यान रितेश जसा बड्या पडद्यावर प्रसिद्ध आहे तसाच तो सोशल मीडियावर (Riteish Deshmukh Instagram) देखील लोकप्रिय आहे. त्याचे अनेक रील्स व्हायरल होत असतात. तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुख (Riteish Deshmukh and Genelia Deshmukh) इन्स्टाग्रामवर इतके विनोदी रील्स शेअर करतात, की या रील्ससाठी एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. दरम्यान मराठी तसंच काही हिंदी प्रोजेक्ट्सवर काम करणाऱ्या रितेशने आता आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो की चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रितेशचा अवतार पाहून चाहत्यांना हसू आवरेनासं झालं आहे. या व्हिडीओमध्ये रितेश त्याच्या पुढ्यात वाढण्यात आलेल्या जेवणावर ताव मारत आहे. त्याच्या ताटात अनेक पदार्थ आहेत आणि तो अक्षरश: बोटं चाटत चाटत ते पदार्थ खात आहे. तो खाण्यात एवढा गुंगं झालाय की वाढलेल्या पोटामुळे त्याच्या शर्टाची बटणं निघाली आहेत, हे देखील रितेशच्या ध्यानात येत नाही आहे. हे वाचा- VIDEO: ‘पिछे जा यार…’, Malaika ला भेटण्यासाठी गेलेली Kareena Kapoor अशी का संतापली? आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढा फिट असणाऱ्या रितेशचं पोट एवढं वाढलं तरी कसं? तर याचं उत्तर आहे रितेशचा नवा सिनेमा- मिस्टर मम्मी. रितेशने  ‘ये लो कालरी मील.’ (Low calorie meal)असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. शिवाय त्याने असेही म्हटले आहे की, जेव्हा तुमचा दिग्दर्शक तुम्हाला वजन वाढवायला सांगतो तेव्हा असं होतं. रितेशचा हा व्हिडीओ देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

जाहिरात

जानेवारी महिन्यात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी मिस्टर मम्मी (Mister Mummy) या विनोदी सिनेमाची घोषणा केली होती. या प्रोजेक्टसंबंधातील पोस्ट रितेशने केली आहे. या सिनेमाचं पोस्टर फारच रंजक वाटत आहे, नावाप्रमाणेच सिनेमात काहीतरी अजब पाहायला मिळणार आहे. दरम्यान मिस्टर मम्मीचे दिग्दर्शन शाद अली करत आहे. ते प्रसिद्ध कॉमेडी ड्रामा बंटी और बबलीचे दिग्दर्शक आहेत.

दरम्यान रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही जोडी आजही अनेकांची फेव्हरिट जोडी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रितेश-जिनिलिया हे रिअल कपल 12 वर्षांनी एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात