Home /News /entertainment /

VIDEO: 'पिछे जा यार...', Malaika ला भेटण्यासाठी गेलेली Kareena Kapoor अशी का संतापली?

VIDEO: 'पिछे जा यार...', Malaika ला भेटण्यासाठी गेलेली Kareena Kapoor अशी का संतापली?

Kareena Kapoor Viral Video: मलायका बरी झाल्यानंतर अभिनेत्री करिना कपूर सोमवारी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. यावेळी एक विचित्र घटना घडल्याचं पाहायला मिळालं.

  मुंबई, 05 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor Khan Viral Video) खानची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora Accident) हिचा नुकताच कार अपघात झाला. त्यानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो (Malaika Arora Health Update) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्याठिकाणी मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि बहीण अमृता अरोराचीही तिने भेट घेतली. आता मलायका बरी झाल्यानंतर अभिनेत्री करिना कपूर सोमवारी तिला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. यावेळी एक विचित्र घटना घडल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी जेव्हा करिना कपूर खान मलायकाच्या घरी भेटण्यासाठी पोहोचली, तेव्हा तेथे अनेक पापाराझीही उपस्थित होते. यादरम्यान करिना कपूर खानच्या कारने एका पापाराझीला धक्का दिल्याने त्याला जखम झाली. ही घटना घडल्यानंतर बेबो संतापलेली पाहायला मिळाली. ती ओरडून तिच्या ड्रायव्हरला म्हणाली, 'कार मागे घे यार...' करिना मलायकाच्या घरातून परतत असताना ही घटना घडली. पुष्पाच्या 'श्रीवल्ली'चा आधीच झाला आहे साखरपुडा, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी बनली नॅशनल क्रश प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यासह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की पापाराझी असण्याची ही बाजू देखील आहे की सेलेब्स किंवा कोणतीही घटना कॅप्चर करताना त्यांना धोका असतो.
  या घटनेच्या व्हिडीओत कॅमेरामन दुखापत झाल्याने ओरडच असल्याचे ऐकू येत आहे की- ‘मेरा पैर, मेरा पैर.’ त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं तो जखमी झाला आहे. ही घटना करिना कपूरही पाहते आणि ती तिच्या ड्रायव्हरवर ओरडताना दिसत आहे. ती यावेळी संतापून म्हणते की, 'सांभाळ अरे, मागे जा... असा पळवू नकोस, पळत का आहेस?' करिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचा रागीट अवतार पाहायला मिळतो आहे. या व्हिडीओवर देखील हजारो कमेंट्स आल्या आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Kareena Kapoor, Social media viral

  पुढील बातम्या