कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...

कधीकाळी एकता कपूरशी लग्न करायला तयार झाला होता करण जोहर, पण...

करण आणि एकताच्या लग्नाच्या चर्चा एकेकाळी बॉलिवूडमध्ये जोरदार सुरू होत्या. एका मुलाखतीत करण जोहरनं स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता.

  • Share this:

मुंबई, 7 मे : टीव्ही निर्माती एकता कपूर आणि करण जोहर यांच्यात खूप चांगली मैत्री आहे आणि हे दोघंही त्यांच्या करिअरमध्ये सुद्धा खूप यशस्वी झाले आहेत. त्यांच्या मैत्रीबद्दल तर संपूर्ण बॉलिवूडला माहित आहे. त्यांच्या मैत्री एका गोष्टीचं साम्य आहे ते म्हणजे हे दोघंही सरोगसीच्या मदतीनं पालक झाले आहेत. पण या दोघांमध्ये अनेक गोष्टी कॉमन होत्या. ज्याबद्दल ऐकून सर्वच हैराण होतील. पण या व्यतिरिक्त या दोघांच्या लग्नाच्या चर्चा एकेकाळी बॉलिवूडमध्ये जोरदार सुरू होत्या. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

एका मुलाखतीत करण जोहरनं स्वतःच या गोष्टीचा खुलासा केला होता. या मुलाखतीत करण म्हणाला होता, जर मला आणि एकताला योग्य जोडीदार मिळाला नाही तर आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करू. आमच्या लग्नामुळे कोणाला आनंद होऊ दे किंवा नको होऊ दे पण माझ्या आईला मात्र खूप आनंद होईल. कारण जर आमचं दोघांचं लग्न झालं तर आईला सीरिअलमध्ये पुढे काय होणार आहे हे सर्वांच्या अगोदर माहित असेल.

करण जोहर आणि एकता कपूर यांच्यात त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमध्येही एक चांगलं बॉन्डिंग आहे. दोघंही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच करणनं त्याचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्याचे केस पांढरे झालेले दिसत होते. ज्यावर कमेंट करताना एकतानं करणला तिचा सुपरहिट शो 'कसौटी जिंदगी की'मधील एक भूमिका ऑफर केली होती.

लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं...

एकता कपूरनं करणच्या या फोटोवर कमेंट करताना त्याला मिस्टर बजाजची भूमिका ऑफर केली होती. तिनं लिहिलं, माझी एक टीव्ही मालिका आहे. ज्यात मिस्टर ऋषभ बजाजचे केस पांढरे आहेत आणि तो खूप हॉट आहे. आम्ही सीरिअलमध्ये चेहरे बदलत असतो. तर तुला आवडलं तर तू प्लिज टीव्हीसाठी ट्राय कर. कारण इथे प्रेक्षकांना खूश करणं खूप सोपं आहे.

(संपादन- मेघा जेठे)

ग्लोबलस्टार होऊनही अजिबात सुटलेली नाही प्रियांका चोप्राची 'मिडल क्लास' सवय!

First published: May 7, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या