Home /News /entertainment /

KBC 12 च्या शूटिंगवरुन वाद, बिग बी म्हणाले; 'माझ्या कामाचा तुम्हाला त्रास असेल तर...'

KBC 12 च्या शूटिंगवरुन वाद, बिग बी म्हणाले; 'माझ्या कामाचा तुम्हाला त्रास असेल तर...'

लॉकडाऊनमध्ये केबीसीच्या प्रोमो शूटिंगवरुन अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

  मुंबई, 7 मे : कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्यासाठी केंद्र सरकार कडून प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोनी टीव्हीवरील बहुचर्चित शो कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग सुरू केल्याचं बोललं जात आहे. ज्यावरून अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. या शोच्या शूटिंग सतत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहे. देशात लॉकडाऊन सुरू असताना या शोचं शूटिंग सुरू कसं केलं गेलं असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच KBC 12 चा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. ज्यानंतर सोशल मीडियावरुन अमिताभ बच्चन यांच्यावर टीका करण्यात आली. पण आता यावर स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका ट्वीटमधून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं... अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, 'हो, आत्ताच कामावरुन परतलो आहे. तुम्हाला जर यामुळे काही त्रास होत असेल तर ते तुमच्या पर्यंतच मर्यादित ठेवा. मी योग्य ती काळजी घेतली आहे. दोन दिवसाचं शूट एका दिवसात पूर्ण केलं आहे. संध्याकाळी 6 वाजता सुरू केलेलं काम काही वेळातच संपलं.' लॉकडाऊनमध्ये केबीसीच्या शूटिंगवरुन अमिताभ बच्चन यांच्यावर सतत्यानं सवाल उपस्थित केले जात होते. सोशल मीडियावरुन त्यांना ट्रोलही करण्यात आलं. ज्यावर प्रतिक्रिया देत अमिताभ यांनी सर्व युजर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
  अमिताभ बच्चन यांनी सांगितलं, यावर्षी कौन बनेगा करोडपतीची पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे. एवढंच नाही तर रजिस्ट्रेशनसाठी तयार करण्यात आलेला प्रोमो सुद्धा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरीच शूट केला आहे. दंगल आणि छिछोरे या सिनेमांचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी अमिताभ बच्चन यांना एक सॅम्पल व्हिडीओ शेअर केला होता. ज्याच्या मदतीनं अमिताभ यांनी प्रोमोचा व्हिडीओ शूट केला. (संपादन- मेघा जेठे.) करिनाचा प्रेग्नन्सीमधला Photo होतोय व्हायरल, काय आहे या मागचं खास कारण? अरे बापरे! दिशा पाटनीला म्हणते, देवाने मला चार बॉयफ्रेंड दिले तर...
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bollywood

  पुढील बातम्या