कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन असलं तरी काही दिवसांपूर्वीच वाइन शॉप सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली. मात्र त्यानंतर जो गोंधळ उडाला तो सर्वांनाच माहित आहे. पण दारूच्या नशेचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो असं नाही अनेक बॉलिवूड स्टार्सना सुद्धा याचा फटका बसाला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने 2012 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबईला हरवत IPL चॅम्पियनशिप आपल्या नावे केली होती. मात्र याच्या सेलिब्रेशन वेळी शाहरुखनं MCI आणि BCCI च्या अधिकाऱ्याशी वाद घातला होता. ज्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यावेळी शाहरुख दारुच्या नशेत होता असं स्पष्ट केलं होतं
2002 मध्ये सलमान खानवर ड्रंक अँड ड्राइव्हची केस चालवली गेली होती. याशिावय काही पार्ट्यांमध्ये दारुच्या नशेत सलमाननं भांडणं केल्याचं समोर आलं होतं मात्र त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही.
अभिनेता संजय दत्तनं त्यांच्या ड्रग्स आणि दारुच्या नशेबाबत त्याच्या बायोपिकमध्ये कबुली दिलीच आहे. एक वेळ अशी होती की संजूबाबा नेहमीच नशेच असायचा त्यामुळे त्याचे अनेकांशी वादही झाले होते.
टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्याचे सहकारी सुनिल ग्रोवर आणि चंदन प्रभाकर यांनी कपिलनं त्यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता.
अभिनेत्री राखी सावंतनं गायक मिका सिंगवर दारूच्या नशेत तिला दबरदस्ती किस केल्याचा आरोप केला होता. 2006 मध्ये मिका सिंगच्या बर्थडे पार्टीत घडलेला हा किस्सा बराच चर्चेत राहिला होता.
निर्माता करण जोहर मागच्याच वर्षी एका व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आला होता. त्याच्या पार्टीतल्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जवळापास सर्वच स्टार कलाकार दारूच्या नशेत दिसले होते. मात्र यावर करणनं ते नशेत नव्हते फक्त नशेत असल्याचा अभिनय करत होते असं स्पष्टीकरण दिलं होतं.