आता दीपिकाची ही इच्छा कधीच नाही होणार पूर्ण; ऋषी कपूरही या 'Intern' ची पाहात होते वाट

आता दीपिकाची ही इच्छा कधीच नाही होणार पूर्ण; ऋषी कपूरही या 'Intern' ची पाहात होते वाट

काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी घोषणा केली होती की ते लवकरच दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न' या सिनेमात दिसणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. एकीकडे काल 29 एप्रिलला इरफान खानचं निधन झालं. त्यानंतर लगेच आज 30 एप्रिलला ऋषी कपूर यांचं निधन झालं. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. पण दीपिकाच्या सिनेमात काम करण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली.

काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी घोषणा केली होती की ते लवकरच दीपिका पदुकोणसोबत द इंटर्न या सिनेमात दिसणार आहेत. पण आता त्यांच्या अचानक जाण्यानं दीपिकाला सुद्धा धक्का बसला. ऋषी कपूर आणि दीपिकाचं एक खास नातं होतं. ते कॅन्सरवर उपचार घेत असताना दीपिका त्यांना भेटायला न्यूयॉर्कला गेली होती. दीपिकाचा हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा 'द इंटर्न'चा हिंदी रिमेक असणार आहे. या सिनेमाची निर्मिती दीपिका पदुकोण करत आहे.

अखेर लेक रिद्धिमा कपूरला मिळाली खास परवानगी, प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचणार

याशिवाय त्यांचा दुसरा सिनेमा 'शर्माजी नमकीन' हा होता. या सिनेमात ते जूही चावला सोबत काम करणार होते. हा सिनेमा साइन केल्यानंतर 2018 त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. ज्याच्या उपचारांसाठी ते अमेरिकेला रवाना झाले होते. त्यामुळे या सिनेमाचं शूटिंग रखडलं होतं. पण आता हा सिनेमा सुद्धा अपूरा राहिला.

 

View this post on Instagram

 

‪Waiting to join the unit , shoot in delhi , and scrabble championships with Chintuji ..!!!....

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla) on

1970 सालच्या 'मेरा नाम जोकर'मध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी 1973 साली 'बॉबी' ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका निभावल्या. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. 90 च्या व 2000 च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला. 'कुछ तो है' या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलरनं खुर्चीला खिळवून ठेवलं. तर 'अग्निपथ(नविन)' मध्ये रौफ लालाची भूमिका चांगलीच गाजली होती.

बाबा तुम्ही माझे योद्धा आहात, ऋषी कपूरांच्या लेकीने व्यक्त केल्या भावना

इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

First published: April 30, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading