बाबा तुम्ही माझे योद्धा आहात, तुमची खूप आठवण येईल; ऋषी कपूरांच्या लेकीने व्यक्त केलेल्या भावनांनी तुमचे डोळे पाणावतील

बाबा तुम्ही माझे योद्धा आहात, तुमची खूप आठवण येईल; ऋषी कपूरांच्या लेकीने व्यक्त केलेल्या भावनांनी तुमचे डोळे पाणावतील

लेक आणि वडिलांमध्ये अनोखं नातं असतं. रिद्धिमा बाबाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत नव्हती. मात्र तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते, चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कपूर घराणाऱ्यातील एक पुष्प आज गळून पडले. अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचं आज निधन झालं. कालच अभिनेता इरफान खान यांची वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. सलग दोन चांगल्या कलाकारांच्या अशा एग्जिटमुळे जनतेमध्ये दु:खाचं वातावरण आहे. सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने अवघ्या 20 जणांच्या उपस्थितीत ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांची मुलगी रिद्धिमा (Ridhima Kapoor) लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकून पडली आहे. आपल्या बाबांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी तिने सरकारकडे मुंबईला जाण्याची परवानगी मागितली आहे. सरकारने 5 जणांना परवानगी दिली असून ती मुंबईला पोहोचल्यानंतरच ऋषी कपूर यांचं अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही. बाप आणि लेकीचं नातं अनोखं असतं. त्यांच्यात भांडण होत असले तरी ते अतूट असतं. रिद्धिमा बाबाच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत नव्हती. मात्र आपल्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तिने ऋषी कपूर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. यावर ती लिहिते, ' बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि कायम करीत राहीन. माझ्या मजबूत योद्ध्याच्या आत्मास शांती लाभो. मला तुमची रोज आठवण येईल. मला तुमचे फेस टाइम कॉल्स नेहमी आठवतील. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बाबा.'

रिद्धिमा मुंबईला रस्ते मार्गाने येणार आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्काराला वेळ लागू शकतो. रिद्धिमा आल्यानंतरच ऋषी कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ऋषी कपूर जितके चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते तितकेच ते सामाजिक व राजकीय विषयांवरही आपली मतं न घाबरता मांडत असे. सोशल मीडियावर ते विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करीत होते. त्यांनी घेतलेल्या एग्झिटमुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

संबंधित - घरी नेणार नाही ऋषी कपूरांचं पार्थिव, दिल्लीत अडकलेल्या लाडक्या लेकीची प्रतीक्षा

 

First published: April 30, 2020, 3:26 PM IST

ताज्या बातम्या