इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

इरफाननं एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्यासोबत केलेल्या 'डी डे' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा एक किस्सा शेअर केला होता.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडसाठी हा आठवडा एकामागोमाग एक दुःखद वृत्त घेऊन येणारा ठरला. अवघ्या 22 तासांत बॉलिवूडनं दोन सुपरस्टार गमावलं आहे. बुधवारी म्हणजेच 29 एप्रिलला अभिनेता इरफान खानचं निधन आणि आज ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन. दोन्ही कलाकार मागच्या काही काळापासून कॅन्सरशी लढत होते. ऋषी कपूर तर 2019 च्या अखेरीस कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतले होते. या दोन्ही कलाकारांना ही इंडस्ट्री आणि त्यांचे चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. विशेष म्हणजे या दोघांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं.

इरफान खान आणि ऋषी कपूर या दोघांनीही निखिल अडवाणीच्या दिग्ददर्शनाखाली बनलेल्या 'डी डे' या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाबाबत बोलताना इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. इरफाननं ऋषी कपूर यांच्याबद्द काम करणं हे त्याच्यासाठी स्वप्नवत असल्याचं सांगितलं होतं. आपण आज या दोन्ही सुपरस्टार्सना गमवलं असताना इरफानं सांगितलेली ही गोष्ट सर्वांनाच भावुक करणारी आहे.

इरफाननं या मुलाखतीत या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा एक किस्सा शेअर केला होता. तो म्हणाला होता, सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं की आम्ही सर्व ऋषी कपूर यांच्या भोवती बसत असू. त्यांच्याकडे खूप मजेदार गोष्टी होत्या. ज्या सांगून ते सर्वांच मनोरंजन करत असत. ऋषी कपूर एक महान कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करुन मला खूपच छान वाटलं. त्याच्यासोबत काम करणं माझ्यासाठी एक स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. हे स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल असा मी कधीच विचार सुद्धा केला नव्हता.

जीवन मरणाशी लढत होते ऋषी कपूर, मुलानं सांगितलं वडिलांच्या मनात काय होतं

निखिल अडवाणीच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'डी डे' हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात इरफान खाननं एका रॉ एजंटचं काम केलं होतं. तर ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी मिळती जुळती भूमिका साकारली होती.

अवघ्या 22 तासांत एकाच आजारामुळं बॉलिवूडनं गमावले दोन चमकते तारे

शेवटच्या श्वासापर्यंत तिनं दिली साथ..., ऋषी कपूर यांची न ऐकलेली गोष्ट

First published: April 30, 2020, 1:28 PM IST

ताज्या बातम्या