हॉस्पिटलमध्ये अंथरुणावर असतानाही डॉक्टरांच्या गाण्याला अशी दिलखुलास दाद देणारे ऋषी कपूर; VIDEO होतोय VIRAL

हॉस्पिटलमध्ये अंथरुणावर असतानाही डॉक्टरांच्या गाण्याला अशी दिलखुलास दाद देणारे ऋषी कपूर; VIDEO होतोय VIRAL

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. मुंबईच्या एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते. या ठिकाणीच त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्या जाण्यानं संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ऋषी कपूर मागच्या काही काळापासून कॅन्सरने ग्रस्त होते. अमेरिकेतून उपचार घेऊन ते भारतात परतले होते. त्यांची प्रकृती सुधारत असतानाच अचानक काल त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात भरती करण्यात आलं मात्र आज सकाळी त्यांचं निधन झालं.

दरम्यान सध्या ऋषी कपूर रुग्णालयात उपचार घेत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात एक डॉक्टर ऋषी कपूर यांच्यासाठी गाणं गाताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ऋषी कपूर यांनी या डॉक्टरला आशीर्वादही दिले होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अखेर लेक रिद्धिमा कपूरला मिळाली खास परवानगी, प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचणार

आर जे शोनाली नावाच्या युजरनं त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक डॉक्टर, 'तेरे दर्द से दिल आबाद रहा, दर्द से दिल आबाद रहा कुछ भूल गए, कुछ याद रहा कुछ याद रहा...' हे गाणं गाताना दिसत आहे. यानंतर ऋषी कपूर त्याला आशीर्वाद देतात आणि त्याला सांगतना दिसतात की, आयुष्यात खूप मोठा हो. मेहनत कर खूप नाव कमव. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच पण एक लक्षात ठेव की आयुष्यात मेहनत खूप महत्त्वाची आहे. त्याच्याशिवाय तुला पैसा आणि नाव कमावता येणार नाही.

(संपादन- मेघा जेठे.)

बाबा तुम्ही माझे योद्धा आहात, ऋषी कपूरांच्या लेकीने व्यक्त केल्या भावना

इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

First published: April 30, 2020, 4:47 PM IST

ताज्या बातम्या