मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Richa Chadha: 'कलाकार म्हणजे शांती दूत...' जेव्हा रिचाने केली होती पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण

Richa Chadha: 'कलाकार म्हणजे शांती दूत...' जेव्हा रिचाने केली होती पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण

रिचा चढ्ढा

रिचा चढ्ढा

अभिनेत्री रिचा चढ्ढावर बॉलिवूडमधूनही टीका होत आहे. आजच अक्षय कुमारने ट्विट करत तिचा निषेध केला आहे. आता याचदरम्यान रिचाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 25 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या एका ट्विटमुळे वादात सापडली आहे. रिचाने भारतीय लष्कराबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमुळे तिला ट्रोल  केलं जात आहे. रिचाने नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या बोलण्यावर आपले म्हणणे मांडले तेव्हाच सगळा गोंधळ सुरू झाला. वाढतं ट्रोलिंग पाहून आता रिचाने एक लांबलचक पोस्ट लिहून माफी मागितली. पण तिच्या या वादग्रस्त ट्विटला सामान्य प्रेक्षक तर विरोध करत आहेतच पण बॉलिवूडमधूनही तिच्यावर टीका होत आहे. आजच अक्षय कुमारने ट्विट करत तिचा निषेध केला आहे. आता याचदरम्यान  रिचाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांचयाविषयी  रिचाने केलेल्या वादग्रस्त ट्विट बद्दल तिने माफी मागितली असली तरी तिच्यासमोर आता नवीन अडचणी उभ्या राहत आहेत. एकीकडे तिच्या आगामी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत असताना आता दुसरीकडे तिचं जुनं वक्तव्य चर्चेत आलं आहे.गलवान  मध्ये घडलेल्या प्रसंगानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली होती. तेव्हा रिचाने यावर व्यक्त केलेलं मत आता चर्चेत आलं आहे.  तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Priyanka Chopra : 'काही लोकांपासून माझ्या करियरला धोका...' प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा

2019 मध्ये पाकिस्तान सातत्याने भारतीय चित्रपटांवर बंदी घालत होता. असे असूनही भारतीय कलाकार तिथे जाऊन परफॉर्म करत होते. यावर एका रिपोर्टरने रिचाला तिचं मत विचारलं होतं, त्यावर ती म्हणाली होती कि, 'याविषयी माझा दृष्टिकोन वेगळा आहे. मला वाटतं एक कलाकार नेहमी प्रेम आणि शांततेबद्दल बोलतो. मला वाटतं कलाकारावर बंदी आहे कारण ते दोन देशांमध्ये मैत्री घडवून आणू शकतात.''  त्याचवेळी, दुसर्‍या एका कार्यक्रमात रिचा म्हणताना दिसत आहे, ''जर पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हाकलून दिले तर हल्ले होणार नाहीत याची खात्री तुम्हाला असेल तरच त्यांच्यावर बंदी घाला. याविषयी तुम्हाला तरी खात्री आहे का?''

याशिवाय एका जुन्या मुलाखतीमध्ये रिचा पाकिस्तान मध्ये काम करण्याबद्दल म्हणाली होती कि, ''मी प्रथम माझ्या थिएटर ग्रुपबरोबर प्रथम पाकिस्तानात आले. तेव्हाचा अनुभव फारच अविस्मरणीय होता. लाहोरमधील रस्ते आणि तिथलं वातावरण, अनारकली बाजार मला प्रचंड आवडला. लोकसुद्धा खूप नम्र होती. मला असं जाणवलं की दोन्ही देशातील लोकांना शांती हवी आहे, राजकीय नेत्यांमुळे ही मंडळी गोंधळून जातात.''

आता या सगळ्या  प्रकरणात सोशल मीडियावर रिचाचा  आगामी चित्रपट 'बॉयकॉट फुक्रे 3' ला बॉयकॉट करा' हा ट्रेंड सुरू झाला आहे. रिचा चड्ढाने तिच्या वादग्रस्त विधानाबद्दल योग्य प्रकारे माफी मागावी, असे युजर्सचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर रिचा चढ्ढा यांच्याबाबतचे अनेक मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Richa chadda